आशिया खंडातील क्रिकेटची सर्वात मोठी स्पर्धा असलेल्या आशिया चषक स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. यापूर्वी भारतीय संघाच्या निवडीबाबत दिल्ली येथे बीसीसीआयची बैठक होणार आहे. या बैठकीला भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हेदेखील उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत आणखी एक मोठा निर्णय होऊ शकतो. ज्यामध्ये हार्दिक पंड्या याच्याकडून उपकर्णधारपद काढून घेतले जाण्याची शक्यता आहे.
निवड समितीच्या बैठकीत काय निर्णय घेतले जातात याकडे तमाम क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून आहे. संघनिवड झाल्यानंतर निवडसमिती अध्यक्ष अजित आगरकर हे पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे या बैठकीत अनेक मोठे निर्णय होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जातेय.
एका आघाडीच्या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, आगामी आशिया चषक व वनडे विश्वचषकासाठी भारताच्या वनडे उपकर्णधारपदावरून हार्दिक पंड्या याची गच्छंती होऊ शकते. वेस्ट इंडीज दौऱ्यावर पंड्या याच्या नेतृत्वात भारतीय संघाला टी20 मालिका गमवावी लागली होती. तसेच, त्याची वैयक्तिक कामगिरी देखील तितकी प्रभावी झालेली नाही.
पंड्या याला हटवल्यानंतर त्याच्याजागी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याची वर्णी लागू शकते. तब्बल 11 महिन्यानंतर पुनरागमन केलेला बुमराह सध्या आयर्लंड दौऱ्यावर भारताचे नेतृत्व करतोय. यापूर्वी त्याने इंग्लंडमध्ये एका कसोटीत भारताचे नेतृत्व केले होते.
हार्दिक मागील वर्षीच्या उत्तरार्धापासून सातत्याने भारतीय संघाचा कर्णधार व उपकर्णधार राहिला आहे. आयपीएलच्या पहिल्या दोन हंगामात तो आपल्या गुजरात टायटन्स या संघाला अंतिम फेरीत घेऊन गेला. त्यानंतर त्याच्याकडे सातत्याने टी20 नेतृत्व दिले गेले. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत तो वनडे संघाचे नेतृत्व देखील करताना दिसलेला.
(Jasprit Bumrah set to be the Vice Captain of team India for Asia Cup 2023)
महत्त्वाच्या बातम्या-
आणखी किती खेळणार उस्मान ख्वाजा? पठ्ठ्याने स्पष्टच सांगितलं; म्हणाला, ‘जोपर्यंत…’
‘पहिल्यांदाच भारतीय खेळाडूशिवाय ड्रेसिंग रूम…’, CPL 2023मध्ये रायुडूला झाली टीम इंडियाची आठवण