भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी आता रंजक टप्यात पोहोचली आहे. पहिल्या दोन कसोटीनंतर आता उभय संघ 1-1 ने बरोबरीत आहेत. ॲडलेडमध्ये मोहम्मद सिराज आणि ट्रॅव्हिस हेड यांच्यातील गरमागरम वादविवादानेही मालिका वेगळ्या पातळीवर पोहचली आहे. भारताला दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून 10 गडी राखून पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला दुखापत होण्याची भीती असल्याने टीम इंडिया एका खास कारणासाठी चिंतेत होती. मात्र, आता भारतासाठी एक आनंदाची बातमी आली असून बुमराहने कोणतीही अडचण न येता गोलंदाजीचा सराव सुरू केला आहे. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे.
खरं तर, ॲडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाच्या गोलंदाजीदरम्यान एक वेळ अशी आली की जसप्रीत बुमराहला अस्वस्थतेमुळे गोलंदाजी करणे अर्धवट सोडून मैदानावर बसावे लागले. त्यावेळी बुमराहला पुन्हा दुखापत होण्याची शक्यता असल्याने भारतीय संघ आणि चाहत्यांची चिंता वाढली होती. फिजिओनेही मैदानात येऊन त्याची तपासणी केली.
काही वेळाने बुमराह पुन्हा गोलंदाजीसाठी सज्ज झाला आणि त्याने आपले षटक पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात बुमराहने फक्त एकच षटक टाकले. पण यादरम्यान तो सामान्य गतीने गोलंदाजी करताना दिसला नाही. सोमवारी सराव सत्रातही तो सहभागी झाला नाही. याच कारणामुळे त्याच्या दुखापतीची चर्चा होती. मात्र आता बुमराह ब्रिस्बेनमध्ये खेळण्यासाठी सज्ज झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ ब्रिस्बेनला पोहोचला असून गुरुवारीही खेळाडूंनी नेटमध्ये जोरदार सराव केला. यावेळी जसप्रीत बुमराहही दिसला. त्याने सुरुवातीला लेग ब्रेक गोलंदाजी केली पण नंतर त्याच्या सामान्य गोलंदाजी केली. यावरून बुमराह ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दणदणीत तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत.
Jasprit Bumrah started off with a couple of leg-breaks alongside R Ashwin but he’s now running in hot & bowling at full tilt, being an absolute handful to KL Rahul & Yashasvi Jaiswal #AusvInd pic.twitter.com/3IRzE0QXbm
— Bharat Sundaresan (@beastieboy07) December 12, 2024
सध्याच्या मालिकेत जसप्रीत बुमराह भारतीय गोलंदाजीत सर्वात यशस्वी ठरला आहे आणि त्याच्यावर मोठी जबाबदारी आहे. मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीत टीम इंडियाला बुमराहकडून मोठ्या अपेक्षा आहेत आणि त्याने अद्याप निराश केलेला नाहीये. तिसऱ्या कसोटीतही त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
हेही वाचा-
ZIM VS AFG; झिम्बाब्वेचा वरचढ, रोमहर्षक सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव!
चॅम्पियन्स ट्रॉफी वादात नवा ट्विस्ट! वनडे ऐवजी टी20 फॉरमॅट मध्ये स्पर्धा होणार?
स्मृती मानधानाचा विश्वविक्रम, अशी कामगिरी करणारी जगातील पहिली क्रिकेटर!