---Advertisement---

जसप्रीत बुमराह करतोय सुट्टी एन्जॉय! पत्नी संजनासोबतचा रोमँटिक फोटो झाला व्हायरल

On: सोमवार, ऑगस्ट 1, 2022 6:41 PM
---Advertisement---

भारतीय संघा सध्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. मात्र, भारताचा दिग्गज वेगावन गोलंदाज जसप्रीत बुमराह या दौऱ्यात संघासोबत नाहीये. वर्क लोड मॅनेज करण्यासाठी निवडकर्त्यांनी त्याला विश्रांती दिली आहे. अशात तो आणि त्याची पत्नी संजना गणेशन या सुट्टीचा पुरेपूर फायदा घेत आहेत.

संजना गणेशन (Sanjana Ganeshan) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांचा एक रोमॅन्टिक फोटो सध्या समोर आला आहे. फोटोत दोघेही एकमेकांच्या गळ्यात हात घालून लाचताना दिसत आहे. बुमराहच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून हा फोटो शेअर केला गेला आहे. ही पोस्ट चाहत्यांच्या चांगलीच पसंतीला उतरली आहे. पोस्टवर लाईक्सला पाऊस पडत आहे आणि कमेंट्सही मोठ्या प्रमाणात येत आहेत. दरम्यान, या पोस्टच्या कॅप्शनची खास चर्चा होत आहे.

पोस्टच्या कॅप्शनमध्ये बुमराहने इंग्रजीत लिहिले आहे की, “बेटर टुगेदर, एव्री स्टेप ऑफ द वे.” बुमराह आणि संजनाला एकत्रा पाहून चाहत्यांना पोस्ट लाईक करण्याचा मोह आवरता येत नाहीये. पोस्ट टाकल्यानंतर २४ तासांच्या आतमध्येच यावर २ लाखांपेक्षा अधिक लाईक्स आल्या आहेत. ट्वीटवर अनेकांनी या पोस्टला रिट्वीट देखील केले आहे.

https://www.instagram.com/p/CgtQBbEvQFL/?utm_source=ig_web_copy_link

बुमराहच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने आतापर्यंत ३० कसोटी सामन्यांमध्ये १२८ विकेट्स घेतल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने ७२ आणि टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये ५८ सामने खेळले आहेत. मर्यादित षटकांच्या या प्रकारात त्याने अनुक्रमे १२१ आणि ६९ विकेट्स घेतल्या आहेत. असे असले तरी वेस्ट इंडीज दौऱ्यात बुमराहची कमी भरण्यासाठी भारताकडे काही उत्कृष्ट वेगवान गोलंदाज उपलब्ध आहेत.

अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार, आवेश खान आणि अष्टपैलू हार्दिक पंड्या असे वेगवान गोलंदाजीचे पर्यात सध्या संघात आहेत. वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना भारताने ६८ धावांनी जिंकला आणि संघ ०-१ असा आघाडीवर आहे. टी-२० मालिकेतील दुसरा सामना सोमवारी खेळला जाईल. तत्पूर्वी उभय संघात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली गेली होती, ज्यामध्ये यजमान संघाला ०-३ असा क्लीन स्वीप मिळाला होता.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

“दिनेश कार्तिक पाकिस्तानात जन्माला असता तर…” माजी कर्णधाराने काढले पाक क्रिकेटचे वाभाडे

CWG 2022 | कॉमनवेल्थ गेम्समध्ये सायकलस्वारांनी सोडला ट्रॅक, पाहा भीषण अपघाताचा व्हिडिओ

हरमनप्रीतने चालवली टीम इंडियाची परंपरा, भारत-पाकिस्तान सामन्यानंतर केले ‘हे’ हृद्य जिंकणारे कृत्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---