भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह त्याच्या बेधडक गोलंदाजीसाठी ओळखला जातो. बुमराह आपल्या यॉर्कर चेंडूने प्रत्येक फलंदाजाला चिंतेत टाकतो. तरीही खूप कमी लोकांना माहिती आहे की, बुमराह काही प्रमाणात चांगली फलंदाजीदेखील करतो.
बुमराहने याचा पुरावा मंगळवारी (२८ एप्रिल) दिला. त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरून फलंदाजी करतानाचा एक व्हिडिओ पोस्ट केला. ज्यामध्ये तो गोलंदाजांना फटकेबाजी करताना दिसला. बुमराहने सांगितले की, त्याने या सामन्यात २० चेंडूत ४२ धावा केल्या होत्या.
On popular demand (mostly by @YUVSTRONG12), here’s presenting, Jasprit Bumrah’s match winning knock of 2017! pic.twitter.com/gnaSrZUOWn
— Jasprit Bumrah (@Jaspritbumrah93) April 28, 2020
बुमराहने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “खूप मागणीनुसार, मी तुमच्यासमोर सादर करीत आहे, जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) सामना-विजयी फलंदाजी, २०१७.”
झाले असे की, युवराज सिंग (Yuvraj Singh) आणि बुमराह यांनी इंस्टाग्राम लाईव्ह चॅटमार्फत (Instagram Live Chat) संवाद साधला. यादरम्यान युवराजने त्याच्या फलंदाजीबद्दल थट्टा केली होती.
यावेळी युवराज म्हणाला होता की, “वनडेत तुझी सर्वाधिक धावसंख्या ही १० आहे. कसोटीतही तू १० पेक्षा अधिक धावा केल्या नाहीत. तसेच आयपीएलमध्ये तर तुझा सर्वोत्तम धावसंख्या ही १६च आहे. तसेच ४० प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये तू केवळ ४२ धावा केल्या आहेत.”
युवराजच्या या वक्तव्यावर बुमराहने चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. तो म्हणाला की, “जर मलाच फलंदाजी करावी लागली तर इतर खेळाडू काय करणार? तसंही मी ‘अ’ दर्जाच्या सामन्यात २० चेंडूत ४२ धावांची चमकदार खेळी केली होती.” युवराजला प्रत्युत्तर देण्यासाठी बुमराहने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्या खेळीचा व्हिडिओ शेअर केला.
बुमराहने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, “मला लहानपणापासूनच फलंदाजांनी धावा केलेल्या आवडत नव्हत्या. मला वेगात धावणे, फलंदाजांनी भीती घालणे आवडत होते. जे वेगवान गोलंदाज करत होते.”
बुमराहने २०१६मध्ये सिडनी येथे झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सामन्यातून भारतीय संघात पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत १४ कसोटी सामने, ६४ वनडे सामने आणि ५० आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने कसोटीत ६८ विकेट्स, वनडेत १०४ विकेट्स आणि टी२०त ५९ विकेट्स घेतल्या आहेत.
ट्रेंडिंग लेख-
-रोहित शर्मा विषयक १० अशा गोष्टी ज्या फारशा चर्चिल्या गेल्या नाहीत
-रोहित शर्माचे हे ५ विक्रम कोणत्याही खेळाडूला मोडणे केवळ अशक्य
-३३ वर्षीय रोहित शर्माबद्दल फारशा माहित नसलेल्या १० गोष्टी