---Advertisement---

बुमराहचे झाले कमबॅक; ऑस्ट्रेलिया, श्रीलंका विरुद्ध मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

---Advertisement---

पुढील महिन्यात भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध 3 टी20 सामन्यांची मालिका तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध 3 वनडे सामन्यांची मालिका होणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी बीसीसीआयने काल(23 डिसेंबर) भारतीय संघाची घोषणा केली आहे.

भारताच्या वनडे आणि टी20 अशा दोन्ही संघात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा समावेश करण्यात आला आहे. तो मागील अनेक महिन्यांपासून पाठिच्या दुखापतीमुळे भारतीय संघापासून दूर होता.

याचबरोबर शिखर धवनचेही भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. तोही दुखापतीमुळे नुकत्याच पार पडलेल्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी20 आणि वनडे मालिकेतून बाहेर पडला होता. पण आता त्याचाही भारताच्या दोन्ही संघात समावेश करण्यात आला आहे.

तसेच भारताचा मर्यादीत षटकांच्या क्रिकेटचा उपकर्णधार रोहित शर्माला आणि मोहम्मद शमीला 5 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या श्रीलंका विरुद्धच्या टी20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. या विश्रांतीनंतर ते दोघेही 14 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेतून भारतीय संघात पुनरागमन करेल.

यष्टीरक्षक म्हणून दोन्ही संघात रिषभ पंतला कायम केले आहे. तसेच संजू सॅमसनला टी20 संघात कायम केले आहे.

याबरोबरच शार्दुल ठाकूर आणि नवदीप सैनी यांचाही भारताच्या दोन्ही संघात समावेश करण्यात आला आहे.

दीपक चाहर, भुवनेश्वर कुमार दुखापतीमुळे या दोन्ही मालिकांना मुकणार आहेत.

असा आहे श्रीलंका विरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ – 

विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, संजू सॅमसन, रिषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी, जसप्रीत बुमराह, वॉशिंग्टन सुंदर.

असा आहे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ – 

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, केदार जाधव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, नवदीप सैनी, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी.

#श्रीलंकेचा भारत दौरा – 2020

5 जानेवारी – पहिला टी20 सामना – गुवाहाटी

7 जानेवारी – दुसरा टी20 सामना – इंदोर

10 जानेवारी – तिसरा टी20 सामना – पुणे

#ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा – 2020

14 जानेवारी – पहिला वनडे – मुंबई

17 जानेवारी – दुसरा वनडे – राजकोट

19 जानेवारी – तिसरा वनडे – बंगळूरु

https://twitter.com/Maha_Sports/status/1209123612969431041

https://twitter.com/Maha_Sports/status/1209121071095377921

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---