---Advertisement---

अखेर तो क्षण आला! जसप्रीत बुमराह आपल्या घातक फॉर्ममध्ये परतला, नेट्समधील व्हिडिओ व्हायरल

On: बुधवार, ऑगस्ट 16, 2023 6:18 PM
Jasprit Bumrah
---Advertisement---

भारतीय संघ आयर्लंडमध्ये दाखल झाला आहे. यजमान आयर्लंड आणि भारत यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. जसप्रीत बुमराह या मालिकेत मैदानात पुनरागमन करणार आहे. सोबतच त्याच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी देखील दिली गेली आहे. मालिका सुरू होण्याआधी बुमराह नेट्समध्ये गोलंदाजी करतानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज आहे. पण बुमराह मागच्या 10-11 महिन्यांपासून एकही सामना खेळला नाहीये. दुखापतीच्या कारणास्तव दरम्यानच्या काळात त्याच्यावर शस्त्रक्रिया देखील झाली. शस्त्रक्रियेनंतर मागच्या मोठ्या काळापासून तो बेंगलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत फिटनेस मिळवण्याचा प्रयत्न करत होता. पण वेगवान गोलंदाज आता पूर्णपणे फिट झाल्याचे दिसते.

एनसीएत असताना त्याने काही सराव सामन्यांमध्ये अप्रतिम गोलंदाजी केली. या प्रदर्शनाच्या जोरावर त्याने आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघात पुनरागमन केले. या दौऱ्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) हे विरष्ठ खेळाडू नसल्यामुळे कर्णधारपदाही बुमराहकडेच आले. ही मालिका रविवारी (18 ऑगस्ट) रोजी सुरू होणार आहे आणि मालिकेतील शेवटचा सामना 23 ऑगस्ट रोजी खेळला जाईल. तत्पूर्वी बुमराह नेट्समध्ये सराव करताना दिसला. त्याला अगदी जुन्या अंदाजात गोलंदाजी करताना पाहून चाहत्यांचा अपेक्षा अधिकच वाढल्या आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत बुमराह घातक यॉर्कर आणि बाउंसर टाकताना दिसत आहे.

https://twitter.com/BCCI/status/1691774589519659519?s=20

(Jasprit Bumrah started bowling like before)

आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ –
जसप्रीत बुमराह (कर्णधार), रुतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, टिळक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग , मुकेश कुमार, आवेश खान.

महत्वाच्या बातम्या –
World Cup 2023: जोफ्रा आर्चरसाठी धक्का! बेन स्टोक्सचे इंग्लंड संघात कमबॅक
BREAKING! विश्वचषकाच्या तोंडावर पाकिस्तानला धक्का, स्टार गोलंदाजाकडून अचानक निवृत्तीची घोषणा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---