भारतीय संघाचा यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहने आपल्या गोलंदाजीने नेहमी सर्वांनाच प्रभावित केले आहे. सध्याच्या जगात तो जगातील सर्वोत्तम गोलंदाज समजला जातो. बुमराहने वयाच्या १४व्या वर्षी क्रिकेटमध्ये कारकिर्द करण्याचा निर्णय घेतला होता.
अनेक लोकांचे असे मत होते की, त्याची गोलंदाजीची ऍक्शन (शैली) त्याच्यासाठी घातक ठरेल. बुमराह जेव्हा ५ वर्षांचा होता, तेव्हा त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. यानंतर त्याचे कुटुंब आर्थिकरित्या कमकुवत झाले होते. त्याच्या आईने बुमराह आणि त्याच्या लहान बहिणीचा सांभाळ केला.
एकेकाळी तर बुमराहकडे (Jasprit Bumrah) एक जोड बूट आणि एक जोड टी-शर्टदेखील नव्हते. तो एकच टी-शर्ट रोज धुवून घालत होता. एकदा तो त्याच्या आईबरोबर बाजारात गेला होता, तेव्हा त्याने नाईके (NIKE ) कंपनीचे बूट पाहिले. परंतु त्याची आई म्हणाली की, ते विकत घेण्याइतपत पैसे आपल्याकडे नाहीत.
परंतु आज आपण पाहिले तर बुमराह नाईके (Nike) कंपनीचा टी-शर्ट घालतो. या कंपनीचा लोगो भारतीय संघाच्या टी-शर्टवर दिसतो. भारतीय संघाला २००३ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवणाऱ्या प्रशिक्षक जॉन राईट यांनी त्याला आयपीएलमधील फ्रंचायझी मुंबई इंडियन्स संघामध्ये सामील करून घेतले. ते बुमराहपासून खूप प्रभावित होते.
ज्या बुमराहकडे कधी बूट विकत घेण्यासाठी पैसे नव्हते, तो आज पगारातून १४ कोटी रुपये कमावतो. बीसीसीआयकडून त्याला ७ कोटी आणि मुंबई इंडियन्सकडून ७ कोटी रुपये वर्षाला मिळतात. याव्यतिरिक्त बक्षीस रक्कम (प्राईझ मनी) आणि जाहिरातीतून मिळणारी रक्कम वेगळी आहे.
बीसीसीआय एक कसोटी सामना खेळल्यावर १५ लाख रुपये, एक वनडे सामना खेळल्यावर ६ लाख रुपये आणि एक आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळल्यावर ३ लाख रुपये देते.
बुमराहने जानेवारी २०१९ पासून ५ कसोटी, २० वनडे आणि १० टी२० सामने खेळले आहेत. अशाप्रकारे त्याने जानेवारी २०१९पासून कसोटीत ७५ लाख, वनडेत १ कोटी २० लाख आणि टी२०त ३० लाख रुपये कमावले आहेत.
बुमराहने दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये कसोटीच्या एका डावात प्रत्येकी ५ विकेट्स घेतल्या आहेत. तो एकाच वर्षात असे करणारा आशियाचा पहिलाच गोलंदाज आहे. २०१८मध्ये त्याने कसोटीमध्ये ४८ विकेट्स घेतल्या आहेत. कोणत्याही भारतीय गोलंदाजासाठी पहिल्या वर्षात केलेला हा एक विक्रम आहे.
बुमराहला २०१८मध्ये सर्वोत्तम कामगिरीमुळे आयसीसीच्या कसोटी आणि वनडे संघात सामील केले. तो सर्वात वेगवान १०० विकेट्स घेणारा भारताचा दुसरा गोलंदाज आहे. तो कसोटीत हॅट्रिक घेणारा तिसरा भारतीय खेळाडूदेखील आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
–विराटही दुसऱ्यांच्या लग्नात जाऊन जेवणं करुन धरायचा घरचा रस्ता
-विराटला चोरी करायची होती मास्टर ब्लास्टरची ही गोष्ट, पण
-वनडे सामन्यांमध्ये ‘हॅट्रिक’ घेणार भारताचे ४ दिग्गज गोलंदाज