fbpx
Tuesday, April 20, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एकेवेळी नव्हते नाईके कंपनीचे बुट खरेदीला पैसे, आज आहे टीम इंडियाचा शिलेदार

May 18, 2020
in टॉप बातम्या, क्रिकेट
0

भारतीय संघाचा यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहने आपल्या गोलंदाजीने नेहमी सर्वांनाच प्रभावित केले आहे. सध्याच्या जगात तो जगातील सर्वोत्तम गोलंदाज समजला जातो. बुमराहने वयाच्या १४व्या वर्षी क्रिकेटमध्ये कारकिर्द करण्याचा निर्णय घेतला होता.

अनेक लोकांचे असे मत होते की, त्याची गोलंदाजीची ऍक्शन (शैली) त्याच्यासाठी घातक ठरेल. बुमराह जेव्हा ५ वर्षांचा होता, तेव्हा त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. यानंतर त्याचे कुटुंब आर्थिकरित्या कमकुवत झाले होते. त्याच्या आईने बुमराह आणि त्याच्या लहान बहिणीचा सांभाळ केला.

एकेकाळी तर बुमराहकडे (Jasprit Bumrah) एक जोड बूट आणि एक जोड टी-शर्टदेखील नव्हते. तो एकच टी-शर्ट रोज धुवून घालत होता. एकदा तो त्याच्या आईबरोबर बाजारात गेला होता, तेव्हा त्याने नाईके (NIKE ) कंपनीचे बूट पाहिले. परंतु त्याची आई म्हणाली की, ते विकत घेण्याइतपत पैसे आपल्याकडे नाहीत.

परंतु आज आपण पाहिले तर बुमराह नाईके (Nike) कंपनीचा टी-शर्ट घालतो. या कंपनीचा लोगो भारतीय संघाच्या टी-शर्टवर दिसतो. भारतीय संघाला २००३ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवणाऱ्या प्रशिक्षक जॉन राईट यांनी त्याला आयपीएलमधील फ्रंचायझी मुंबई इंडियन्स संघामध्ये सामील करून घेतले. ते बुमराहपासून खूप प्रभावित होते.

ज्या बुमराहकडे कधी बूट विकत घेण्यासाठी पैसे नव्हते, तो आज पगारातून १४ कोटी रुपये कमावतो. बीसीसीआयकडून त्याला ७ कोटी आणि मुंबई इंडियन्सकडून ७ कोटी रुपये वर्षाला मिळतात. याव्यतिरिक्त बक्षीस रक्कम (प्राईझ मनी) आणि जाहिरातीतून मिळणारी रक्कम वेगळी आहे.

बीसीसीआय एक कसोटी सामना खेळल्यावर १५ लाख रुपये, एक वनडे सामना खेळल्यावर ६ लाख रुपये आणि एक आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळल्यावर ३ लाख रुपये देते.

बुमराहने जानेवारी २०१९ पासून ५ कसोटी, २० वनडे आणि १० टी२० सामने खेळले आहेत. अशाप्रकारे त्याने जानेवारी २०१९पासून कसोटीत ७५ लाख, वनडेत १ कोटी २० लाख आणि टी२०त ३० लाख रुपये कमावले आहेत.

बुमराहने दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये कसोटीच्या एका डावात प्रत्येकी ५ विकेट्स घेतल्या आहेत. तो एकाच वर्षात असे करणारा आशियाचा पहिलाच गोलंदाज आहे. २०१८मध्ये त्याने कसोटीमध्ये ४८ विकेट्स घेतल्या आहेत. कोणत्याही भारतीय गोलंदाजासाठी पहिल्या वर्षात केलेला हा एक विक्रम आहे.

बुमराहला २०१८मध्ये सर्वोत्तम  कामगिरीमुळे आयसीसीच्या कसोटी आणि वनडे संघात सामील केले. तो सर्वात वेगवान १०० विकेट्स घेणारा भारताचा दुसरा गोलंदाज आहे. तो कसोटीत हॅट्रिक घेणारा तिसरा भारतीय खेळाडूदेखील आहे.

ट्रेंडिंग घडामोडी-

–विराटही दुसऱ्यांच्या लग्नात जाऊन जेवणं करुन धरायचा घरचा रस्ता

-विराटला चोरी करायची होती मास्टर ब्लास्टरची ही गोष्ट, पण

-वनडे सामन्यांमध्ये ‘हॅट्रिक’ घेणार भारताचे ४ दिग्गज गोलंदाज


Previous Post

ड्रग्ज घेतल्यामुळे बंदी आलेले जगातील ५ क्रिकेटपटू, दोन आहेत…

Next Post

टीम इंडियाचे ४ असे कर्णधार, जे फारसे कुणाच्याही लक्षात नाहीत…

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@IPL/@cricketaakash
IPL

‘जेव्हा सुर्यास्त होतो, तेव्हा..’ समालोचक आकाश चोप्राने धोनीबद्दल केलं असं काही भाष्य, उडाली खळबळ!

April 20, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

नाणं उचला अन् खिशात टाका, गल्ली क्रिकेटची सवय का अजून काही; बघा संजू सॅमसनने काय सांगितलं?

April 20, 2021
Photo Courtesy: Instagram/@Dhanashree9
इंग्लंडचा भारत दौरा

मिस्टर अँड मिसेस चहल मुंबईत दाखल, आकाशातून क्लिक केला मायनगरीचा नेत्रदिपक फोटो; तुम्हीही घ्या पाहून

April 20, 2021
Photo Courtesy: Screengrab/Hotstar
IPL

Video: एकचं नंबर! लाईव्ह सामन्यात धोनीचा जड्डूला गुरुमंत्र अन् दुसऱ्या चेंडूवर फलंदाज बोल्ड

April 20, 2021
Photo Courtesy: Instagram/@hardikpandya93
IPL

‘पंड्या फॅमिली’चा स्वॅगचं निराळा, झक्कास डान्सने लाखो चाहत्यांना लावलं वेड; एकदा व्हिडिओ बघाच

April 20, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

गेल, कोहली किंवा धोनी नव्हे तर ‘हे’ आयपीएलचे सर्वात खतरनाक फलंदाज, फिरकीपटू कुलदीपने सांगितली नावं

April 20, 2021
Next Post

टीम इंडियाचे ४ असे कर्णधार, जे फारसे कुणाच्याही लक्षात नाहीत...

‘धोनी आणि चेन्नईबद्दल मनात तिरस्कार नाही; मात्र, मला त्या संघाची जर्सी बिलकुल आवडत नाही’

भारतीय वंशाचे ‘हे’ पाच खेळाडू, ज्यांनी परदेशी संघांचे केले नेतृत्व

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.