नॉटिंघम येथील ट्रेंट ब्रिज मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत संघात बुधवारपासून (४ ऑगस्ट) कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जवळपास दीड महिन्याच्या कालावधीनंतर भारतीय संघाने मैदानावर उतरताना धमाकेदार सुरुवात केली.
भारतीय संघाची जोरदार सुरुवात
उभय संघातील या बहुप्रतिक्षित मालिकेसाठी सर्व क्रिकेटप्रेमी अत्यंत आतुर होते. पाच सामन्यांच्या या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. गोलंदाजांसाठी फायदेशीर असणाऱ्या या खेळपट्टीवर त्याने घेतलेला हा निर्णय काहीसा चकित करणारा होता.
इंग्लंडसाठी रॉरी बर्न्स व डॉम सिब्ली यांनी सलामीची जबाबदारी सांभाळत मैदानात पाऊल ठेवले. भारतासाठी पहिले षटक जसप्रीत बुमराह टाकत होता. त्याने पहिले चार चेंडू अत्यंत वैविध्यपूर्ण टाकत बर्न्सला जखडून ठेवले. षटकातील पाचवा चेंडू बुमराहने खोल टप्प्याचा टाकल्याने तो बर्न्सच्या पॅडवर आदळला. भारतीय खेळाडूंनी जोरदार अपील केल्याने पंचांनी त्याला बाद ठरवले.
पंचांनी बाद दिल्यानंतर बर्न्स याने सिब्लीशी चर्चा करून तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली. पंचांनी सर्व बाबींची खातरजमा केल्यानंतर मैदानावरील पंचांचा निर्णय कायम ठेवला. त्यामुळे, इंग्लंडच्या खात्यावर एकही धाव नसताना त्यांना आपला पहिला बळी गमवावा लागला.
India start the Test series with a bang.
Live Scorecard & Videos: https://t.co/5eQO5BWXUp#ENGvIND pic.twitter.com/dqKg5gHnoh
— England Cricket (@englandcricket) August 4, 2021
भारतीय संघाने केले आश्चर्यकारक बदल
पहिल्या सामन्यात भारतीय संघाने अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन व वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा यांना विश्रांती देत शार्दुल ठाकूर व मोहम्मद सिराज यांना संघात स्थान दिले. सरावादरम्यान जखमी झालेल्या मयंक अगरवाल याच्या जागी केएल राहुलला संधी मिळाली.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय महिला हॉकी संघाने गमावली फायनलमध्ये पोहोचून इतिहास रचण्याची संधी; आता खेळणार ‘कांस्य’ सामना
शॉचा इंग्लंडमध्ये प्रवेश अन् संघातील ‘या’ अनुभवी खेळाडूंची वाढली चिंता, करू शकतो रिप्लेस
“त्याला बाद केले तरी मला फरक पडणार नाही”, जेम्स अँडरसनचे भारतीय कर्णधाराबाबत वक्तव्य