इंग्लंड आणि भारत यांच्यामध्ये नॉटिंघम येथे पहिला कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. बऱ्याच काळानंतर केएल राहुल भारतीय संघात परतला आहे. तर, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांनाही संघात स्थान देण्यात आले आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्माला विश्रांती देण्यात आली आहे.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने अष्टपैलू म्हणून रवींद्र जडेजाला संघात स्थान दिले आहे. मात्र, अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
अश्विनला संघातून वगळणे भारतीय चाहत्यांना आवडलेले नाही. त्यामुळे अनेकांनी कर्णधार कोहलीच्या या निर्णयावर टीका केली आहे. तसेच जडेजाऐवजी अश्विनला संघात सामाविष्ट करण्याची मागणी देखील केली आहे. अगदी माजी भारतीय क्रिकेटपटू वसिम जाफर यांनीही मीम शेअर करत आश्चर्च व्यक्त केले आहे.
Unfair to drop Ashwin when he did so well for Notts in the pre season prep.
— Sai Sashank (@Saisashank_221) August 4, 2021
No Ashwin?! #ENGvIND pic.twitter.com/JC3buwzdH6
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) August 4, 2021
Ok, now to the cricket.
No Ashwin?!!!!!!!!!!!!!!!!!!! ????????????#ENGvIND pic.twitter.com/jbWN4Y4OAR
— Gaurav Kapur (@gauravkapur) August 4, 2021
https://twitter.com/rohitz28/status/1422897359525011457?s=20
Without Ashwin and with jadeja is a tough choice. I feel India would face difficulty in 2 innings of eng to all out them.
It's hard to take full wickets in 2nd innings#IndvsEng
— Ashok kumar (@ashok7545) August 4, 2021
इंग्लंड संघाविरुद्ध कसोटीत अश्विनला बाहेर बसवल्यानंतर चाहत्यांनी कर्णधार कोहली आणि संघ व्यवस्थापनावर टीका करणे साहजिक आहे. कारण अश्विनची सध्याची कामगिरीही चांगली राहिली आहे. तसेच त्याची इंग्लंडविरुद्धची आकडेवारीही प्रशंसनीय आहे. त्याने काही दिवसांपुर्वी इंग्लंडच्या साउथम्पटनमध्ये झालेल्या विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात एकूण ४ विकेट्स घेतल्या होत्या. दोन्ही डावात प्रत्येकी २ विकेट्सची कामगिरी त्याने केली होती. त्यातही न्यूझीलंडच्या दुसऱ्या आणि सामन्याच्या शेवटच्या डावात तो एकटाच भारताकडून विकेट्स घेऊ शकला होता.
अश्विनची इंग्लंडविरुद्धची आकडेवारी पाहायची झाल्यास, त्याने आतापर्यंत १९ कसोटी सामन्यातील ३५ डावात गोलंदाजी करताना ८८ विकेट्स घेतल्या आहेत. सक्रिय कसोटी संघातून इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेणारा तो पहिला गोलंदाज आहे. त्याच्यानंतर इशांत शर्मा ६२ विकेट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आजवर एकही आयपीएल ट्रॉफी न जिंकलेल्या आरसीबीला कधी रामराम ठोकणार? डिविलियर्स म्हणाला…
बुम बुम बुमराह! अप्रतिम चेंडूने भारताला मिळवून दिले पहिल्याच षटकात यश, पाहा व्हिडिओ
शॉचा इंग्लंडमध्ये प्रवेश अन् संघातील ‘या’ अनुभवी खेळाडूंची वाढली चिंता, करू शकतो रिप्लेस





