---Advertisement---

‘बुमराह लिलावात आला तर किती बोली लागली असती’? अशिष नेहरा म्हणाला, ‘त्याच्यासाठी पूर्ण पर्स….’

Jasprit Bumrah
---Advertisement---

भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दाैऱ्यावर आहे. ज्यात टीम इंडियाला पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. ज्यामध्ये  भारताने 1-0 ने आघडी घेतली आहे. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्तवाखाली भारतीय क्रिकेट संघाने पर्थ कसोटीत कांगारुंचा धुव्वा उडवला होता. ज्यामध्ये कर्णधार बुमराहने शानदार कामगिरी केली. दरम्यान आता आशिष नेहराने जसप्रीत बुमराहचे खूप कौतुक केले आहे.

आशिष नेहराने बुमराहच्या कामगिरीबद्दल बोलताना सांगितले की, पर्थ कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजाने ज्या पद्धतीने कामगिरी केली आहे ते आश्चर्यकारक आहे. भारताने उत्कृष्ट कामगिरी दाखवत पहिला कसोटी सामना जिंकला असून याचे श्रेय बुमराहला जाते. भारताने पहिला कसोटी सामना 295 धावांनी जिंकला होता. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर धावांच्या बाबतीत भारताचा हा सर्वात मोठा विजय आहे. आता या मालिकेतील दुसरा कसोटी सामना 6 डिसेंबरपासून खेळवला जाणार आहे.

पुढे बोलताना नेहराने असेही सांगितले की, जर बुमराह लिलावात असता तर त्याच्यावर पैशांचा वर्षाव झाला असता. स्टार स्पोर्ट्सशी बोलताना आशिष नेहरा म्हणाला, जस्सी लिलावात असता तर त्याला विकत घेण्यासाठी पूर्ण पर्स रिकामी (कमी पडली) झाली असती. आशिष नेहरा हे गुजरात टायटन्सचे प्रशिक्षक आहेत.

मुलाखतीदरम्यान नेहराने मोहम्मद शमीबद्दलही सांगितले, “आम्ही शमीला आरटीएम अंतर्गत परत खरेदी करणार होतो, परंतु आरटीएमनंतर त्याला मिळणारी रक्कम आमच्या बजेटपेक्षा जास्त होती. त्यामुळेच आम्ही त्याला आमच्या संघात समाविष्ट करू शकलो नाही. शमीसाठी आम्ही वेगळे बजेटही ठेवले होते.”

आयपीएल लिलावानंतर गुजरात टायटन्स संघ 

शुबमन गिल (कर्णधार), जाॅस बटलर, बी साई सुदर्शन, शाहरुख खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा, राहुल तेवतिया, रशीद खान, निशांत सिंधू, महिपाल लोमरोर, कुमार कुशाग्रा, अनुज रावत, मानव सुथार, वॉशिंग्टन सुंदर, जेराल्ड कोएत्झी, मोहम्मद अर्शद खान, गुरनूर सिंग ब्रार, शेरफान रदरफोर्ड, आर. साई किशोर, इशांत शर्मा, जयंत यादव, ग्लेन फिलिप्स, करीम जनात, कुलवंत खेजरोलिया

हेही वाचा-

हा खेळाडू होणार दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार! संघ मालकाचा मोठा इशारा?
IPL 2025; आयपीएलमधील सर्व 10 संघांचे सर्वात महागडे खेळाडू!
हार्दिक पांड्याने सीएसकेच्या गोलंदाजाला धुतला, एकाच षटकात ठोकल्या 29 धावा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---