---Advertisement---

भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्त्व करणारा ३६वा कर्णधार असेल बुमराह, पहिल्या कॅप्टनचे नाव माहितीय का?

On: शुक्रवार, जुलै 1, 2022 7:42 AM
Jasprit-Bumrah
---Advertisement---

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघात मोठा बदल करण्यात आला आहे. कोरोनाग्रस्त असलेला भारताचा कर्णधार रोहित शर्मा इंग्लंडविरुद्धच्या पुनर्निधारित पाचव्या कसोटी सामन्यातून बाहेर झाल्याने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला नेतृत्त्वपदी निवडले गेले आहे. हा सामना ऍजबस्टन येथे १ जुलैपासून खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी मैदानावर उतरताच बुमराह मोठा विक्रम करेल. तो कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे नेतृत्त्व करणारा ३६ वा कर्णधार बनेल. 

बुमराहपूर्वी (Jasprit Bumrah) ३५ खेळाडूंनी भारताच्या कसोटी संघाचे (Indian Test Captains List) नेतृत्त्व केले आहे. १९३२ साली भारतीय संघाने पहिला कसोटी सामना खेळला होता. त्यावेळी दिग्गज क्रिकेटपटू सीके नायुडू यांनी कसोटी संघाचे नेतृत्त्व करण्याचा मान मिळवला होता. त्यांच्यासह १९५२ पर्यंत ४ कर्णधार होऊन गेले, परंतु एकालाही भारतीय संघाला विजय मिळवून देता आला नाही. अखेर विजय हजारे यांनी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पाचव्या व अखेरच्या सामन्यात भारतीय संघाला एक डाव आणि ८ धावांच्या फरकाने पहिलावहिला विजय मिळवून दिला होता.

त्यांच्यानंतरही बऱ्याच दिग्गजांकडे भारताच्या कसोटी संघाची कमान आली. विनू मंकड, पंकज रॉय, कपिल देव, सौरव गांगुली, एमएस धोनी, विराट कोहली ते रोहित शर्मापर्यंत ३५ वेगवेगळे कर्णधार संघाला लाभले. आता बुमराहचेदेखील या यादीच नाव जोडले गेले आहे.

कोण राहिलंय भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार?
आजवरच्या सर्व भारतीय कसोटी कर्णधारांची आकडेवारी पाहिली तर, विराट कोहली (Virat Kohli) सर्वात यशस्वी कर्णधार राहिला आहे. त्याने ६८ सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्त्व करताना सर्वाधिक ४० विजय मिळवून दिले आहेत. तर त्याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ फक्त १७ सामने हारला आहे. ११ सामने अनिर्णीत राखण्यात त्याला यश आले आहे. त्याची कसोटीतील विजयी सरासरी ५८.८२ इतकी आहे.

त्यानंतर धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने सर्वाधिक सामने जिंकले आहेत. ६० सामन्यात धोनीने भारताच्या कसोटी संघाची कमान सांभाळली, त्यापैकी २७ सामने संघ जिंकू शकला, तर १८ सामने संघाने गमावले. तसेच उर्वरित १५ सामने अनिर्णीत राहिले. सध्या बीसीसीआय अध्यक्ष असलेल्या सौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) नेतृत्त्वातही भारतीय संघाने भरपूर विजय मिळवले. ४९ सामन्यात संघाची कमान सांभाळताना २१ सामने जिंकून देण्यात गांगुलीला यश आले.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

धोनीचा आदर्श घेऊन इंग्लंडशी भिडण्यासाठी नवा कर्णधार सज्ज, बुमराहची लक्षवेधी प्रतिक्रिया वाचा

‘…म्हणून मॉर्गन सर्वोत्कृष्ट कर्णधार’, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने स्पष्ट केले कारण

मोठी बातमी! इंग्लंड विरुद्ध टी-२० आणि वनडेसाठी टीम इंडियाची घोषणा, कर्णधार म्हणून…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---