भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या दुखापतीशी झगडत आहे. मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात बुमराहने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला आणि तेव्हापासून तो मैदानातून बाहेर आहे. दुखपातीच्या कारणास्तव बुमराहने आयपीएल 2023 मधून माघार घेतली, तर जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात देखील तो खेळणार नाहीये. असे असले तरी बीसीसीआयला मात्र पूर्ण विश्वास आहे की, बुमराह वनडे विश्वचषकात खेळेल.
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) पाठीच्या दुकापतीमुळे सध्या बेंगलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत रिहॅब करत आहे. भारतीय संघाने नोव्हेंबर 2022मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेसात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली होती. या मालिकेसाठी बुमराह दुखापतीतून सावरून उपलब्ध झाला होता. पण मालिकादरम्यान त्याला पुन्हा दुखापत झाली. यावेळी झालेली दुखापत अधिक गंभीर असल्यामुळे त्याला पाठीची शस्त्रक्रिया देखील करावी लागली. दरम्यानच्या काळात बुमराहने आपल्या फिटनेसवर सराव केला आहे. आयपीएल आणि डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात त्याला खेळता आले नाही, तरी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात खेळल्या जाणाऱ्या वनडे विस्वचषकासाठी (ODI World Cup) तो उपलब्ध राहू शकतो.
एका वृत्तसंस्थेने सूत्रांकडून अशी माहिती मिळाली आहे की, बीबीसीआयला याविषयी पूर्ण खात्री आहे की, जसप्रीत बुमराह वनडे विश्वचषकात भारतीय संघासाठी खेळेल. दरम्यान, यावर्षीची विश्वचषका भारतात खेळवला जाणार असल्याने बुमराहची भूमिका संघासाठी महत्वाची ठरू शकते. आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर बुमराह भारताला इतिहासातील तिसरा वनडे विश्वचषक जिंकवून देऊ शकतो, असा विश्वास देखील अनेकांच्या मनात आहे.
वनडे विश्वचषकाला अजून काही महिने वेळ आहे. विश्वचषकासाठी भारतीय संघ जेव्हा घोषित होईल, तेव्हा बुमराहचे नाव त्यात असणार की नाही, हा प्रश्न अनेकांना आहे. बुमराहला जर विश्वचषकात संधी मिळाली, तर त्याआधी त्याला आपली फिटनेस सिद्ध करण्यासाठी एनसीएची चाचणी द्यावी लागू शकते. त्याला देशांतर्गत क्रिकेटमधील काही सामनेही खेळावे लागू शकतात. (Jasprit Bumrah will be fit for ODI World Cup! Full faith in BCCI)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मी भारतीय चाहत्यांची तोंडं बंद केली…’, शतक ठोकल्यानंतर हे काय बोलला हॅरी ब्रुक
पैसा वसूल! सव्वा तेरा कोटींचा हॅरी ब्रुक बनला आयपीएल 2023 चा पहिला शतकवीर, सनरायझर्सचा 228 धावांचा डोंगर