भारतीय क्रिकेट संघाचा विद्यमान कर्णधार विराट कोहली हा सध्या यूएई येथे सुरू असलेल्या टी२० विश्वचषकात अखेरच्यावेळी भारतीय टी२० संघाचे नेतृत्व करत आहे. त्यानंतर भारतीय संघाचा पुढील कर्णधार कोण असेल या बद्दल उत्सुकता निर्माण झाली असून, उपकर्णधार रोहित शर्मा या पदासाठी सर्वात मोठा दावेदार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, त्याच वेळी अनेक इतर युवा खेळाडूंची नावे देखील कर्णधारपदासाठी चर्चेत आहेत. आता भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा याने आणखी एका नावाची त्यात भर टाकली आहे.
बुमराह असावा भारताचा पुढचा कर्णधार
एका क्रिकेट संकेतस्थळाशी बोलताना भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा याने भारतीय संघाच्या पुढील कर्णधाराविषयी मत मांडले. तो म्हणाला,
“असा कोठेही नियम नाही की वेगवान गोलंदाज संघाचा कर्णधार बनू शकत नाही. कर्टनी वॉल्श, वसीम अक्रम, वकार युनूस व शॉन पोलॉक हे सर्व वेगवान गोलंदाज होते. मला विचाराल तर मी इतर सर्वांसह जसप्रीत बुमराह याला भारताचा पुढील कर्णधार म्हणून पाहू इच्छितो. कारण, तो सध्या तिनही प्रकारात भारतीय संघाचा नियमित सदस्य असून, तो नेहमीच इतरांना मदत करताना दिसतो.”
नेहराच्या या कल्पनेला त्या चर्चेमध्ये सहभागी असलेला भारताचा माजी अष्टपैलू अजय जडेजा यानेदेखील अनुमोदन दिले.
भारतीय संघाचा पुढील कर्णधार म्हणून सध्या अनुभवी रोहित शर्माचे नाव आघाडीवर आहे. त्याबरोबर केएल राहुल, यष्टीरक्षक रिषभ पंत व श्रेयस अय्यर यांच्यादेखील नावाची चर्चा सुरू असून, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ याबाबत लवकरच निर्णय जाहीर करणार आहे. रोहित याने यापूर्वी काही निवडक स्पर्धांमध्ये भारताचे नेतृत्व केले होते. तसेच त्याच्याच नेतृत्वात मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.
धोनीने केलेली भविष्यवाणी
जसप्रीत बुमराह याच्या सुरुवातीला भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला त्याच्यामध्ये पुढील कर्णधार दिसला होता. धोनीने एका मुलाखतीत बुमराह भारताचा पुढील कर्णधार बनू शकतो, असे म्हटले होते. धोनीने यामागे कारण देताना त्याला खेळाची उत्तम जाण असल्याचे म्हटलेले.
महत्त्वाच्या बातम्या-
अरेरे! सलग तीन गडी बाद होऊनही पूर्ण झाली नाही शानदार शमीची हॅट्रिक
मोठी बातमी: भारताला तब्बल १३ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू देणारे प्रशिक्षक तारक सिन्हा कालवश
राजामाणूस विराट! पराभूत स्कॉटिश कर्णधाराची पूर्ण केली इच्छा; केले जातेय कौतुक






