---Advertisement---

दुखापतग्रस्त मयंक यादवला जसप्रीत बुमराहकडून मिळाल्या खास टिप्स! सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

---Advertisement---

आयपीएल 2024 चा 48 वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला. लखनऊच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबईनं लखनऊसमोर अवघ्या145 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. हे लक्ष्य गाठण्यात सुपर जायंट्सला कोणतीही अडचण आली नाही. या सामन्यात लखनऊचा वेगवान गोलंदाज मयंक यादव दुखापतीनंतर परतला होता. परंतु त्याला सामन्याच्या मध्यातच फिटनेसच्या समस्येमुळे मैदान सोडावं लागलं.

सामना संपल्यानंतर मैदानावर एक फारच खास दृष्य पाहायला मिळालं. भारताचे वरिष्ठ खेळाडू नेहमीच युवा खेळाडूंना महत्त्वाच्या टिप्स देत असतात. आयपीएलमध्ये बरेचदा असे दृष्य दिसले आहे. सामना संपल्यानंतर विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी आणि रोहित शर्मासारखे अनुभवी खेळाडू विरोधी संघांच्या युवा खेळाडूंशी संवाद साधताना पाहायला मिळाले आहेत.

लखनऊ विरुद्ध मुंबई सामन्यानंतर हेच दृष्य पाहायला मिळालं. सामना संपल्यानंतर मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह लखनऊचा वेगवान गोलंदाज यश ठाकूर आणि मयंक यादव यांच्याशी बोलताना दिसला. बुमराह या दोघांनी काही तरी समजावून सांगत होता आणि हे दोघं त्याचं बोलणं अगदी लक्ष देऊन ऐकत होते. या तिघांचा हा व्हिडिओ आयपीएलच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. काही वेळातच हा व्हिडिओ व्हायरल झाला. चाहते यावर कमेंट करून बुमराहचं कौतुक करत आहेत.

 

लखनऊचा युवा वेगवान गोलंदाज मयंक यादवनं पदार्पणाच्या हंगामातच आपली चुणूक दाखवली आहे. त्यानं पहिल्या दोन सामन्यांत ताशी 150 किमी हून अधिक वेगानं गोलंदाजी करत प्रत्येकी 3 बळी घेतले होते. तो या दोन्ही सामन्यांमध्ये ‘मॅन ऑफ द मॅच’ राहिला होता. परंतु त्यानंतर त्याला दुखापत झाल्यामुळे बाहेर बसावं लागलं.

मयंकनं मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात पुनरागमन केलं, पण त्याला पुन्हा दुखापत झाली. बोललं जातंय की 3.1 षटके टाकल्यानंतर त्याची जुनी दुखापत पुन्हा उफाळून आली. त्याच्या फिटनेसबाबत अद्याप कोणतही नवं अपडेट आलेलं नाही.

महत्त्वाच्या बातम्या – 

मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर होण्याच्या मार्गावर, रोमांचक सामन्यात लखनऊविरुद्ध पराभव

टीम इंडियासाठी ‘गेम चेंजर’ ठरू शकतो हार्दिक पांड्या! जाणून घ्या का मिळाली टी20 विश्वचषकात संधी?

हर्षित राणाला छोटीशी चूक पडली महागात, ‘फ्लाइंग किस’ दिल्यामुळे बीसीसीआयनं केलं निलंबित

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---