आयपीएल 2024 च्या 48व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्ससमोर मुंबई इंडियन्सचं आव्हान होतं. लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सनं 20 षटकांत 7 गडी गमावून 144 धावा केल्या. प्रत्युत्तरात, 145 धावांचं लक्ष्य लखनऊनं 19.2 षटकांत 6 गडी गमावून गाठलं.
धावांचा पाठलाग करताना लखनऊ सुपर जायंट्सची सुरुवात फारच खराब झाली. आयपीएलमधील आपला पहिला सामना खेळणारा अर्शिन कुलकर्णी पहिल्याच चेंडूवर बाद झाला. नुवान तुषारानं त्याची विकेट घेतली. नुवान तुषाराची आयपीएलमधील ही पहिली विकेट होती. यानंतर कर्णधार केएल राहुल आणि मार्कस स्टॉयनिस यांनी सामन्याची सूत्र हाती घेतली. या दोघांमध्ये तिसऱ्या गड्यासाठी 58 धावांची भागिदारी झाली. केएल राहुल 22 चेंडूत 28 धावा करून तंबूत परतला. हार्दिक पांड्यानं त्याची विकेट घेतली.
चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या दीपक हुड्डानं धावफलक हालता ठेवला. तो 18 चेंडूत 18 धावा करून हार्दिक पांड्याचा बळी ठरला. बुमराहनं त्याचा झेल घेतला. मार्कस स्टॉयनिसनं पुन्हा एकदा शानदार खेळी खेळली. त्यानं 45 चेंडूत 62 धावा केल्या. आपल्या या खेळीत त्यानं 7 चौकार आणि 2 षटकार लगावले. क्रुणाल पांड्या 1 आणि निकोलस पूरन 14 धावा करून नाबाद राहिले.
तत्पूर्वी, नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सनं 7 गडी गमावून 144 धावा केल्या. मुंबईसाठी टीम डेव्हिडनं 18 चेंडूत 3 चौकार आणि एक षटकारासह नाबाद 35 धावा केल्या. नेहाल वढेरानं 46 धावांची तर इशान किशननं 32 धावांची खेळी केली. वढेरानं 41 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकार मारले. तर ईशाननं 36 चेंडूंचा सामना करत तीन चौकार मारले.
बर्थडे बॉय रोहित शर्मा आज काही कमाल करू शकला नाही. तो केवळ 4 धावा करून तंबूत परतला. कर्णधार हार्दिक पांड्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. तर सूर्यकुमार यादवनं 10 आणि तिलक वर्मानं 7 धावा केल्या. लखनऊ सुपर जायंट्सकडून मोहसिन खाननं सर्वाधिक 2 बळी घेतले.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
लखनऊ सुपर जायंट्स – केएल राहुल (कर्णधार/यष्टीरक्षक), मार्कस स्टॉयनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, ॲश्टन टर्नर, आयुष बदोनी, क्रुणाल पांड्या, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, मोहसिन खान, मयंक यादव
इम्पॅक्ट प्लेअर्स – अर्शिन कुलकर्णी, एम सिद्धार्थ, के गौथम, युधवीर सिंग, प्रेरक मंकड
मुंबई इंडियन्स – ईशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नेहाल वढेरा, टिम डेव्हिड, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह
इम्पॅक्ट प्लेअर्स – नुवान तुषारा, कुमार कार्तिकेय, डेवाल्ड ब्रेविस, नमन धीर, शम्स मुलानी
महत्त्वाच्या बातम्या –
टीम इंडियासाठी ‘गेम चेंजर’ ठरू शकतो हार्दिक पांड्या! जाणून घ्या का मिळाली टी20 विश्वचषकात संधी?
हर्षित राणाला छोटीशी चूक पडली महागात, ‘फ्लाइंग किस’ दिल्यामुळे बीसीसीआयनं केलं निलंबित