---Advertisement---

जोफ्रा आर्चर परतला, ख्रिस वोक्सला संधी नाही; गतविजेत्या इंग्लंडनं जाहीर केला टी20 विश्वचषकासाठी संघ

England Cricket Team
---Advertisement---

2024 टी20 विश्वचषकासाठी गतविजेत्या इंग्लंडनं संघ जाहीर केला आहे. इंग्लंडच्या संघात वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचा समावेश करण्यात आला असून तो वर्षभरानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करतोय.

जोफ्रा आर्चरनं इंग्लंडसाठी शेवटचा सामना मे 2023 मध्ये खेळला होता. तेव्हापासून तो कोपऱ्याच्या दुखापतीमुळे संघातून बाहेर आहे. आर्चरशिवाय अनुभवी अष्टपैलू ख्रिस जॉर्डनचा देखील संघात समावेश करण्यात आलाय. तो सप्टेंबर 2023 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.

जोस बटलर संघाचं नेतृत्व करेल. तर फलंदाजांमध्ये विल जॅक्स, फिल सॉल्ट आणि जॉनी बेअरस्टो वरच्या फळीत खेळतील. याशिवाय अनुभवी अष्टपैलू मोईन अलीसह बेन डकेटचाही संघात समावेश करण्यात आलाय. हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन आणि सॅम करन हे संघाला खालच्या फळीत फायरपॉवर प्रदान करतील. तर आदिल रशीद आणि टॉम हार्टले फिरकी आक्रमणाचं नेतृत्व करतील.

2024 टी20 विश्वचषकासाठी इंग्लंडचा संघ – जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम करन, बेन डकेट, टॉम हार्टले, विल जॅक्स, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, फिल सॉल्ट, रीस टॉपली, मार्क वुड

येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, सर्व संघांना 25 मे पर्यंत त्यांच्या संघात बदल करण्याची परवानगी आहे. त्यानंतर कोणत्याही बदलासाठी आयसीसीच्या इव्हेंट तांत्रिक समितीची मंजुरी आवश्यक असेल. विश्वचषकात इंग्लंड आपला पहिला सामना 4 जून रोजी बार्बाडोस येथे स्कॉटलंड विरुद्ध खेळेल. संघ 31 मे रोजी कॅरिबियनला पोहचणार आहे. इंग्लडचा संघ ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड आणि ओमान यांच्यासोबत स्पर्धेच्या ‘ब’ गटात आहे.

इंग्लंड क्रिकेट बोर्डानं पुष्टी केली आहे की, टी20 विश्वचषक संघाचा भाग असलेले इंग्लंडचे खेळाडू आयपीएल 2024 च्या प्लेऑफसाठी उपलब्ध असणार नाहीत.

महत्त्वाच्या बातम्या – 

टी20 विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर, आयपीएल 2024 मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्राधान्य

‘ड्रॉप-इन खेळपट्टी’वर खेळला जाणार भारत-पाकिस्तान सामना, जाणून घ्या काय आहे खासियत

आयपीएल दरम्यानच टी20 वर्ल्ड कपसाठी रवाना होणार टीम इंडिया, तारीख आली समोर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---