टी20 विश्वचषक 2024 साठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करताना दिसेल, तर हार्दिक पांड्या उपकर्णधाराच्या भूमिकेत असेल.
वास्तविक, हार्दिक पांड्याची आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंतची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. त्यामुळे त्याला टी-20 विश्वचषक संघातून वगळलं जाईल, असे मानलं जात होते. मात्र हा अष्टपैलू खेळाडू आपली जागा पक्की करण्यात यशस्वी ठरला आहे. आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या शिवम दुबेचा टी-20 विश्वचषक संघात समावेश करण्यात आला आहे.
भारताच्या गोलंदाजी आक्रमणाबद्दल बोलायचं झालं तर, युजवेंद्र चहलला आयपीएलमध्ये सातत्यानं चांगली गोलंदाजी केल्याच बक्षीस मिळालं आहे. त्याचा संघात भारतीय समोवश झाला. चहलशिवाय कुलदीप यादवचा फिरकी गोलंदाज म्हणून समावेश करण्यात आला आहे.
जर आपण वेगवान गोलंदाजांबद्दल बोललो तर, जसप्रीत बुमराह व्यतिरिक्त मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग टीममध्ये आहेत. याशिवाय आवेश खान आणि खलील अहमद यांना राखीव खेळाडू म्हणून ठेवण्यात आलंय.
जसप्रीत बुमराहची आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील कामगिरी उत्कृष्ट आहे. या मोसमात बुमराहनं आतापर्यंत 9 सामन्यात 17.07 च्या सरासरीनं 14 फलंदाजांना आपला बळी बनवलं आहे. पर्पल कॅपच्या शर्यतीत बुमराह आघाडीवर आहे. तर युजवेंद्र चहलनं 9 सामन्यात 23.54 च्या सरासरीनं 13 विकेट घेतल्या आहेत. कुलदीप यादवनं 8 सामन्यात 21.83 च्या सरासरीनं 12 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे. अर्शदीप सिंगबद्दल बोलायचं झालं तर, या वेगवान गोलंदाजानं 9 सामन्यात 25.17 च्या सरासरीनं 12 विकेट घेतल्या आहेत.
टी20 विश्वचषकासाठी भारतीय टीम – रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
राखीव खेळाडू : शुबमन गिल, रिंकू सिंह, खलिल अहमद, आवेश खान
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलच्या संघांना इंग्लंड क्रिकेट बोर्डाचा दणका! ‘हे’ खेळाडू प्लेऑफमध्ये खेळू शकणार नाहीत
जोफ्रा आर्चर परतला, ख्रिस वोक्सला संधी नाही; गतविजेत्या इंग्लंडनं जाहीर केला टी20 विश्वचषकासाठी संघ