टीम इंडिया (Team india) सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे, जिथे 20 जून पासून भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) दोन्ही संघांमध्ये 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. ही मालिका ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या मालिकेत युवा भारतीय संघाची मोठी परीक्षा असणार आहे, कारण रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे. संघाचे नेतृत्व सध्या युवा कर्णधार शुबमन गिल (Shubman gill) सोपवत आहे. तसेच या मालिकेत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहवर (Jasprit Bumrah) देखील सर्वांच्या नजरा राहणार आहेत.
मालिकेआधी एक रिपोर्ट समोर येत होता ज्यामध्ये सांगितले होते की, बुमराह या मालिकेतील सर्व सामने खेळणार नाही. पण आता बुमराहच्या फिटनेस अपडेट बद्दल माहिती समोर येत आहे, तो शानदार पद्धतीने गोलंदाजी करत आहे. त्याच्या गोलंदाजीने प्रशिक्षक मोर्ने मोर्कल (Morne Morkel) हे देखील प्रभावित झाले आहेत. टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मोर्कल यांचं म्हणणं आहे की, बुमराहच्या फिटनेसमुळे आता भारतीय व्यवस्थापन देखील आनंदी आहे, जी टीम इंडियासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे.
मात्र या बातमीने इंग्लंडला मोठा झटका बसू शकतो, कारण बुमराह इंग्लंड फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरू शकतो. अद्याप हे स्पष्ट झाले नाही की, बुमराह मालिकेतील किती सामने खेळेल आणि ते कोणकोणते असतील. याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा अजून करण्यात आलेली नाही.






