भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या भारतीय संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर आहे. तेथे इंग्लंड विरुद्ध भारत अशी पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. कसोटी मालिकेत जसप्रीत बुमराहने अप्रतिम गोलंदाजीचे प्रदर्शन केले आहे. तो सध्या त्याच्या कारकिर्दीच्या सर्वोत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. मालिकेदरम्यान त्याने स्काय स्पोर्ट्सला एक मुलाखत दिली आहे. ही मुलाखत भारतीय खेळाडू दिनेश कार्तिकने घेतली आहे. यादरम्यान बुमराहने त्याचे व पत्नी संजना गणेशन यांच्यातील नात्यावर प्रकाश टाकला आहे.
या मुलाखतीचे अनेक व्हिडिओ आधीच समोर आले आहेत. दिनेश कार्तिकने घेतलेल्या या मुलाखतीत जसप्रीत बुमराह त्याच्या पत्नी संजनाविषयी बोलताना दिसला आहे. त्याने यावेळी संजना लग्नाअगोदर बुमराहविषयी काय विचार करायची? याचाही खुलासा केला आहे.
तो म्हणाला, “मी तिला (संजना) अनेकदा पाहिले होते, पण आमच्या दोघांमध्ये एकच समस्या होती. मी समजत होतो की, ती खूप गर्विष्ठ आहे आणि ती माझ्याविषयी असाच विचार करायची. हेच कारण राहिले की, आम्ही दोघे फार काळ एकमेकांशी बोलू शकलो नाही.”
“मी संजनासोबत पहिल्यांदा २०१९ मध्ये विश्वचषकादरम्यान बोललो होतो. ती स्पर्धा कव्हर करत होती. पहिल्या मुलाखतीनंतर आम्हा दोघांमध्ये चर्चा सुरू झाली. नंतर आम्ही दोघं चांगले मित्र बनलो आणि आता सर्व व्यवस्थित चालू आहे. आमच्या लग्नाला पाच महिने झाले आहेत आणि आम्ही खूप आनंदी आहोत,” असेही तो म्हणाला.
तो पुढे बोलताना म्हणाला, “ही चांगली गोष्ट आहे की, तिला खेळ आवडतो, क्रिकेटही आवडते. त्यामुळे जेव्हा कधी काही चांगले वाईट गोष्टी घडतात, तेव्हा आम्ही खेळाविषयी चर्चा करू शकतो. हे मला मदतही करते.”
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना द ओव्हल स्टेडियमवर खेळला जात असून मालिकेत दोन्ही संघ १-१ अशा बरोबरीवर आहेत. मालिकेत आतापर्यंत खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांपैकी पहिला सामना पावसामुळे अनिर्णीत राहिला. त्यानंतर दोन्ही संघांनी प्रत्येकी एक-एक सामना आपल्या नावावर केला आहे. चौथा सामना जिंकणारा संघ मालिकेत २-१ अशी आघाडी घेऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
बिग ब्रेकिंग! भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक शास्त्री कोरोना पॉझिटिव्ह, इतर ३ सदस्यही विलगीकरणात
टी२० विश्वचषकापूर्वी वाढली इंग्लंडची चिंता, ‘हा’ धाकड अष्टपैलू स्पर्धेतून बाहेर होण्याची शक्यता
‘वैयक्तिक कटुतेमुळे अश्विनला संघात स्थान दिले नाही’, कर्णधार कोहलीवर विरोधी संघातून जहरी टीका






