सिडनी कसोटी दरम्यान भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने स्पष्ट केले आहे की, सिडनी कसोटीतून बाहेर बसण्याचा अर्थ असा नाही की तो निवृत्ती घेणार आहे. यासोबतच हिटमॅनने असेही सांगितले की, त्याचा खराब फॉर्म पाहता पाचवा आणि शेवटचा सामना न खेळण्याचा निर्णय त्याने घेतला होता. सिडनी कसोटीत रोहित शर्माच्या जागी जसप्रीत बुमराह कर्णधार आहे.
सामन्याच्या दुस-या दिवशी लंच ब्रेक दरम्यान स्टार स्पोर्ट्सशी बोलताना रोहित शर्मा म्हणाला, “मी स्वतः बाहेर राहण्याचा निर्णय घेतला आहे. मी निवडकर्त्यांना आणि प्रशिक्षकांना सांगितले की माझ्या बॅटमधून मला धावा होत नाहीयेत. म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच बाहेर लॅपटॉप, पेन आणि कागद घेऊन बसलेल्या लोकांनी मला निवृत्तीचा सल्ला देऊ नये, हा माझा आधिकार आहे. कधी निवृत्ती घ्यायचा याचा निर्णय मी घेईन.
या मुलाखतीनंतर जतीन सप्रूने रोहित शर्माला धन्यवाद म्हणाला, यानंतर मात्र रोहित शर्माने मजेशीर उत्तर दिले तो म्हणाला, ‘अरे भाऊ मी कुठे जाणार नाही. मी इथेच आहे मी खेळणार आहे.’ यानंतर जतिनने सांगितले मुलाखतीबद्दल धन्यवाद. म्हणालो.
पाहा व्हिडिओ –
This Is VINTAGE ROHIT SHARMA 😂😂😂 pic.twitter.com/TTl7pyH0YY
— Dr Khushboo 🇮🇳 (@khushbookadri) January 4, 2025
पाच सामन्यांच्या या मालिकेत भारत 1-2 ने पिछाडीवर आहे. सिडनी कसोटी जिंकण्यात टीम इंडिया यशस्वी ठरली तर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी संघाला कायम राखता येणार येईल. तर डब्ल्यूटीसी WTC फायनलमध्ये पोहोचण्याच्या आशाही कायम राहतील.
हेही वाचा-
‘ओये काॅन्ट्स…शॉट्स दिसत…’, जयस्वालने केली ऑस्ट्रेलियन सलामीवीराची थट्टा..!
बिग ब्रेकिंगः जसप्रीत बुमराहने चालू सामन्यातच स्टेडियम सोडले, पाहा कारण…
‘तुला टीममधून बाहेरचा रस्ता दाखवला का?’, वैतागलेला रोहित म्हणाला….