---Advertisement---

Video: श्रीनाथ यांनी टाकलेला तो घातक चेंडू, ज्यामुळे फलंदाज जखमी होऊन पडला होता खाली

On: बुधवार, ऑगस्ट 31, 2022 9:00 AM
---Advertisement---

भारतीय क्रिकेटला अनेक दिग्गज गोलंदाजांचा वारसा लाभला आहे. यापैकीच एक गोलंदाज म्हणजे जवागल श्रीनाथ. एक काळ असाही होता, जेव्हा फलंदाज जवागल श्रीनाथ यांच्या वेगवान गोलंदाजीचा सामना करण्यासाठी घाबरायचे. त्यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९६९ रोजी कर्नाटकच्या मैसूर जिल्ह्यात झाला होता. त्यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक मोठ-मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. दरम्यान, १९९२ मध्ये त्यांनी दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात असा काही चेंडू टाकला होता, जो चेंडू लागल्यानंतर फलंदाज मैदानावर पडला होता.

जवागल श्रीनाथ यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक मोठ मोठे पराक्रम केले आहेत. त्यांनी भारतासाठी विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक सामने खेळले आहेत. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ५५१ गडी बाद केले आहेत. त्यांनी १९९२,१९९६,१९९९ आणि २००३ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच १९८९ मध्ये त्यांनी हैदराबाद संघाविरुद्ध रणजी ट्रॉफी स्पर्धेत पदार्पण केले होते आणि पदार्पणाच्या सामन्यातच त्यांनी हॅटट्रिक घेण्याचा विक्रम केला होता.

श्रीनाथचा तो चेंडू लागून फलंदाज जमिनीवर झोपला होता
वेगवान गोलंदाज हे खूप आक्रमक असतात, ते नेहमीच फलंदाजांना स्लेज करत असतात. परंतु जवागल श्रीनाथ कधीच फलंदाजाला स्लेज करताना दिसून आले नव्हते. ते आपल्या वेगवान गोलंदाजीनेच फलंदाजाला अडचणीत टाकायचे. त्यांनी आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळातच दाखवून दिले होते की, ते फलंदाजांसाठी किती घातक ठरू शकतात.

नोव्हेंबर १९९२ मध्ये जोहान्सबर्गच्या मैदानावर दक्षिण आफ्रिका विरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात जवागल श्रीनाथ हे चर्चेत आले होते. या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी जवागल श्रीनाथ यांनी टाकलेला वेगवान चेंडू दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज मेरीक प्रिंगलच्या डोळ्याला जाऊन लागला होता. हा चेंडू इतका घातक होता की, चेंडू लागताच फलंदाज जमिनीवर पडला होता.

या घटनेनंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाण्यात आले होते. त्यानंतर तो फलंदाज या सामन्यात उपलब्ध नव्हता, तसेच संपूर्ण मालिकेतून तो बाहेर झाला होता.(Javagal Shrinath to Meyrick Pringle most brutal bouncer delivery in international cricket)

https://youtu.be/8S2UbA50tGs

सौरव गांगुलीने विश्वचषक खेळण्यासाठी बोलवले होते
एखाद्या खेळाडूने निवृत्ती जाहीर केल्यानंतर खूप कमी वेळेस असे पाहायला मिळते की, त्या संघातील कर्णधार त्याला पुनरागमन करण्यासाठी बोलावून घेतो. असे श्रीनाथ यांच्यासोबत झाले होते. सौरव गांगुलीने त्यांना निवृत्ती जाहीर केल्यानंतरही संघात बोलावून घेतले होते.

श्रीनाथ यांनी २००२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केले होते, परंतु सौरव गांगुलीची अशी इच्छा होती की, त्यांनी २००३ विश्वचषक स्पर्धा खेळावी. त्यामुळे त्यांनी निवृत्तीतून बाहेर पडत २००३ मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. या स्पर्धेत त्यांनी १६ गडी बाद केले होते.

https://twitter.com/bhaleraosarang/status/1432596451616440323?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1432596451616440323%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fsports.ndtv.com%2Fhindi%2Fcricket%2Fjavagal-srinath-to-meyrick-pringle-most-brutal-bouncer-delivery-in-international-cricket-watch-video-2524696

अशी राहिली आहे आंतरराष्ट्रीय कारकीर्द
जवागल श्रीनाथ यांनी आपल्या कारकिर्दीत एकूण ६७ कसोटी सामने खेळले.यादरम्यान त्यांनी २३६ गडी बाद केले होते. तर २२९ वनडे सामन्यात त्यांनी ३१५ गडी बाद केले होते.

महत्त्वाच्या बातम्या –
गोष्ट एका क्रिकेटरची भाग ९: म्हैसुर एक्सप्रेस जवागल श्रीनाथ
वर्ष १९८० मध्येच प्रणवदांना मिळाली होती बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची ऑफर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---