---Advertisement---

‘मृत्यू यायचा तिथेच येतो’, भारतीय संघाबाबत पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचे वादग्रस्त विधान

IND-vs-Pak-Win-Moment
---Advertisement---

मागच्या मोठ्या काळापासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आशिया चषकाच्या मुद्यावरून आमने सामने आहे. यावर्षी होणाऱ्या आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. पण बीसीसीआय मात्र आशिया चषकासाठी पाकिस्तान दौरा करू इच्छित नाही. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे दिग्गज क्रिकेटपटू जावेद मियॉंदाद यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

भारतीय संघ आशिया चषकासाठी पाकिस्तानत न आल्यास पाकिस्तान संघ विश्वचषकासाठी भारतात येणार नाही, अशी भूमिका पीसीबीने काही काळापूर्वी घेतली होती. मात्र, बीसीसीआयने आपला विरोध कायम ठेवल्याने आशिया चषकाचे आयोजन पाकिस्तानसह युएईमध्ये करण्याचे नक्की झाले. याच मुद्द्यावर जावेद मियॉंदाद यांनी एक अत्यंत वादग्रस्त प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले,

“तुम्ही सुरक्षेला विसरून जा. आम्ही असा विचार करतो की एखाद्याला ज्या ठिकाणी मृत्यू यायचं आहे त्याच ठिकाणी येतो. ही सर्व देवाची मर्जी असते. त्यांनी बोलावले की आपल्याला जावे लागते. भारतीय संघाने आम्हाला आमंत्रण दिले तर आम्ही भारताचा दौरा करू. मात्र, त्या बदल्यात त्यांनी पाकिस्तानमध्ये देखील यायला हवे. मागील वेळी आपण भारतात गेलो होतो. यावेळी त्यांनी इकडे यायला हवे.”

असे असले तरी, भारतात होणाऱ्या आगामी विश्वचषकासाठी पाकिस्तानने येण्याचे निश्चित केले असून, त्यांना आपले सामने चेन्नई व कोलकाता येथे खेळायचे आहेत. त्यांनी याबाबत बीसीसीआयशी बोलणे केले असून, बीसीसीआय अंतिम निर्णय घेईल.

(Javed Miandad Controversial Statement On Team India Tour Of Pakistan)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नाशिक द्वारका डिफेंडर्सचा सलग तिसरा विजय
अटीतटीच्या लढतीत परभणी संघाचा विजय तरीही टॉप 4 मधून बाहेर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---