टी20 विश्वचषक 2024 मध्ये भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चमकदार कामगिरी करत जेतेपद पटकावले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने प्रथमच आयसीसी ट्रॉफी जिंकली. यावेळी अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या भूमीवर टी20 विश्वचषक खेळला गेला. विश्वचषकाचा अंतिम सामना बार्बाडोसमध्ये खेळला गेला, ज्यामध्ये भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. याबाबत बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आधीच भाकित केले होते की, भारतीय संघ बार्बाडोसमध्ये विजय मिळवून तिरंगा फडकावेल. यानंतर आता चॅम्पियन्स ट्रॉफीबाबतही जय शहा यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे.
पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ सज्ज आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पुन्हा एकदा आयसीसी ट्रॉफी जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. यावेळी पाकिस्तान आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद भूषवणार आहे. यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून भारतीय संघाकडे 12 वर्षांचा दुष्काळ संपवण्याची संधी असेल. यादरम्यान आता बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे.
बुधवारी (21 ऑगस्ट) क्रिकेट रेटिंग अवॉर्ड्स 2023-24चा पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात बोलताना जय शहा म्हणाले, “रोहित शर्मा बार्बाडोसमध्ये तिरंगा फडकावणार असल्याचं मी राजकोटमध्ये म्हटलं होतं. इथे मी म्हणतोय की 1.4 अब्ज लोकांचा आशीर्वाद मिळाल्यास आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्येही तेच करू.”
भारतीय संघ पाकिस्तानला जाणार का?
यावेळी पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद भूषवत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 फेब्रुवारी महिन्यात सुरू होईल. पण ही स्पर्धा खेळण्यासाठी भारतीय संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार की नाही? याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. बीसीसीआयने पाकिस्तानात जाण्यास स्पष्टपणे नकार दिला नाही, पण भारतीय संघ तिथे जाण्याची शक्यता कमी आहे. दुसरीकडे पाकिस्तान आपल्या आग्रहावर ठाम आहे.
याआधी पाकिस्तानने आशिया चषक 2023 चे ही आयोजन केले होते, परंतु तरीही भारतीय संघ तेथे खेळण्यासाठी गेला नव्हता. त्यावेळी हायब्रीड मॉडेलचा पर्याय ठेवण्यात आला होता. अशा परिस्थितीत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीही हायब्रीड मॉडेल्स पाहायला मिळू शकते. भारतीय संघाचे सामने दुसऱ्या देशात होऊ शकतात.
हेही वाचा –
“ब्रो पुरा बॉलीवूड नाश्ते मे खाता है”, रोहितच्या कूल लूकवर चाहते फिदा; सूर्यकुमारचीही कमेंट
भारताच्या माजी खेळाडूच्या मुलाला मिळाली इंग्लंडकडून खेळण्याची संधी, श्रीलंकेविरुद्ध उतरला मैदानात