भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) गुरुवारी (22 ऑगस्ट) इंस्टाग्रामवर त्याच्या तयारीचा एक व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये रोहित त्याच्या हॉटेलच्या खोलीत क्रिकेट रेटिंग अवॉर्ड्स 2023-24 मध्ये सहभागी होण्यासाठी तयार होताना दिसत आहे. त्याच्या या लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
बुधवारी या पुरस्कार सोहळ्यात रोहित शर्माची वर्षातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली. तर माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सोशल मीडियावर चाहत्यांना रोहित शर्माचा हा लूक खूप आवडला आहे. रोहित शर्माच्या पोस्टवर एका युजरने लिहिले की, “ब्रो पुरा बॉलीवूड नाश्ते मे खाता है.” जूनमध्ये टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर खेळाच्या सर्वात लहान स्वरूपातून रोहित निवृत्त झाला होता. त्याच्या जागी अनुभवी फलंदाज सूर्यकुमार यादव याची कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.
सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाल्यानंतर बोलताना रोहित म्हणाला, “या संघाची परिस्थिती बदलण्याचा आणि तसेच आकड्यांचा फारसा विचार न करता केवळ जिंकण्यात ध्येय ठेवण्याचा माझा इरादा होता. आम्ही असे वातावरण तयार करू इच्छित होतो, जिथे कोणताही खेळाडू येऊन निडरपणे आपला खेळ दाखवू शकतो. आम्ही हे करण्यात बऱ्याच अंशी यशस्वी ठरलो. यामध्ये मला तीन स्तंभांची विशेष मदत झाली. हे तीन स्तंभ जय शहा, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर हे होते.”
View this post on Instagram
या सोहळ्यात विराट कोहली याला सर्वोत्तम वनडे फलंदाज पुरुष हा पुरस्कार मिळाला. तसेच, वनडे विश्वचषकात दमदार कामगिरी करणाऱ्या मोहम्मद शमी याला सर्वोत्तम वनडे गोलंदाज हा पुरस्कार देण्यात आला. पुरुष गटात सर्वोत्तम कसोटी फलंदाज म्हणून यशस्वी जयस्वाल व सर्वोत्तम कसोटी गोलंदाज म्हणून रविचंद्रन अश्विन यांची निवड केली गेली.
हेही वाचा –
चेतेश्वर पुजारासोबत हे काय घडतंय! भारतीय संघापाठोपाठ या विदेशी संघानंही दाखवला बाहेरचा रस्ता
भारताच्या माजी खेळाडूच्या मुलाला मिळाली इंग्लंडकडून खेळण्याची संधी, श्रीलंकेविरुद्ध उतरला मैदानात
क्रिकेटमध्ये भारतीयांचा दबदबा! ऑस्ट्रेलियन संघात 3 भारतीय वंशाच्या खेळाडूंची एन्ट्री