इंडियन प्रीमियर लीग २०२२चा (आयपीएल) हंगाम नुकताच संपला आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सने ७ विकेट्सने विजय मिळवला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्याला १ लाखांपेक्षा जास्त प्रेक्षकांनी उपस्थिती लावली होती. तसेच भारताचे गृहमंत्री अमित शहा त्यांच्या पत्नीसह हा सामना पाहायला आले होते. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिन जय शहा यांनीही प्रत्यक्षात स्टेडियममध्ये जाऊन या सामन्याचा थरार अनुभवला.
ओबेय मॅकॉयच्या (Obed McCoy) चेंडूवर षटकार मारत शुबमन गिलने (Shubman Gill) संघाला ट्रॉफी जिंकून दिली. यानंतर दर्शक दीर्घामधून सामन्याचा आनंद घेणाऱ्या जय शहांनी (Jay Shah) नाचून गुजरातच्या विजयाचा (Gujrat Titans) जल्लोष (Jay Shah Celebration) साजरा केला.
त्याचे झाले असे की, राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निवडली. जोस बटलर (३९ धावा), यशस्वी जयस्वाल (२२ धावा) यांच्या खेळीच्या जोरावर राजस्थानने २० षटकात १३० धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातलाही चांगली सुरुवात मिळाली नाही. परंतु त्यांचा सलामीवीर शुबमन गिल याने ४३ चेंडूत नाबाद ४५ धावा करत संघाला विजय मिळवून देण्यात योगदान दिले. तसेच कर्णधार हार्दिक पंड्याने ३४ व मॅथ्यू वेडने नाबाद ३२ धावांची झंझावाती खेळी केली.
गुजरातने १८ षटकांमध्येच १२७ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे त्यांना १९व्या षटकात विजयासाठी ४ धावांचीच आवश्यकता होती. अशावेळी गुजरातकडून गोलंदाजी करायला ओबेद मॅकॉयला गिलने खणखणीत षटकार मारला. इकडे मैदानावर गिलने जसा षटकार मारला, तसा तिकडे दर्शकांमध्ये बसून सामना पाहात असलेले शहा आपल्या जागेवरून उठून उभे राहिले. त्यांना गुजरातच्या विजयाने इतका आनंद झाला की, ते आनंदाने हात वर करून नाचताना दिसले. तसेच त्यांनी टाळ्या वाजवत गुजरातचे कौतुकही केले. या क्षणाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
.@gujarat_titans – The #TATAIPL 2022 Champions! 👏 👏 🏆 👍
The @hardikpandya7-led unit, in their maiden IPL season, clinch the title on their home ground – the Narendra Modi Stadium, Ahmedabad. 🙌🙌 @GCAMotera
A round of applause for the spirited @rajasthanroyals! 👏 👏 #GTvRR pic.twitter.com/LfIpmP4m2f
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2022
Is this the way a BCCI official should celebrate on a individual team's victory, where is professionalism and neutrality.
Looks like it was all previously fixed. #fixing
Never gonna support this fraud team ever in my life. No joy in IPL this time most boring IPL final.#fixing pic.twitter.com/Z6WbOIuy9Q— Aaradhya (@Aaradhya_2003) May 29, 2022
गुजरातला पदार्पणाच्या आयपीएल हंगामात विजेता बनवत हार्दिकने सर्वांची वाहवाह लुटली आहे. तो एमएस धोनी, रोहित शर्मा आणि गौतम गंभीरनंतर आयपीएल ट्रॉफी जिंकणारा चौथा भारतीय कर्णधार बनला आहे.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल कॉमेंटेटरना पगार मिळतो तरी किती? घ्या जाणून
आरसीबीला आड आला, तो नेहमीच पाण्यात गेला! मुंबई, सीएसकेसारखं संजूच्या टीमचंही भंगल स्वप्न
एकट्या महाराष्ट्रात ३ शहरांत आहेत चक्क ७ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम्स, कोणते ते घ्या जाणून