---Advertisement---

टी20 विश्वचषकासाठी जय शहांची टीम इंडियासाठी खास संदेश, रोहित शर्माकडे केली ही मागणी

On: बुधवार, जून 5, 2024 5:23 PM
jay shah to team india
---Advertisement---

भारतीय संघाचा टी20 विश्वचषकातील पहिला सामना आज (5जून) खेळला जाणार आहे. हा सामना आयर्लंड विरुद्ध न्यूयाॅर्क येथील नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे होणार आहे. या सामन्यात टीम इंडीयाची बाजू भक्कम आसल्याचे म्हंटले जात आहे. कारण पेपरवर भारतीय संघ खूप मजबूत दिसत आहे.

टीम इंडिया आपल्या मोहिमेची सुरुवात या सामन्यानेच करणार नाही, तर त्याचा पुढचा सामना 9 जून रोजी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. मोठ्या सामन्यासाठी त्याचा सराव म्हणून या सामन्याकडे पाहिले जात आहे. यादरम्यान बीसीसीआय सचिव जय शहांनी टीम इंडीया साठी खास संदेश पाठवला आहे.

शहांनी ‘एक्स’ वर पोस्ट करत लिहले की “ट्राॅफी घरी घेऊन या.. जय हिंद” असे म्हंटले आहे. या फोटो मध्ये समोरच्या ओळीत कर्णधार रोहित शर्मा विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह दिसत आहेत. टीम इंडीया आपल्या सराव सामन्यात बांग्लादेशला सहज पराभव केले होते. पण या सामन्यात विराट कोहली खेळला नव्हता.

आयर्लंडविरुद्धच्या टी20 विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात विराट कोहलीने कर्णधार रोहित शर्मासह भारतासाठी डावाची सुरुवात करावी, तर यशस्वी जयस्वाल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करावी, असे महान फलंदाज सुनील गावस्कर यांचे मत आहे. टी-20 विश्वचषकात कोहलीच्या फलंदाजीच्या क्रमाची बरीच चर्चा होत आहे. कारण विराट कोहलीने आयपीएल मध्ये चांगले फाॅर्म दाखवले होते. कोहलीने आयपीएलमध्ये 15 सामन्यात 741 धावा केल्या होत्या.

तर सुनिल गावसकर पुढे म्हणाले तिसऱ्या क्रमांकावर यशस्वी तर चार आणि पाच नंबरवर सुर्यकुमार यादव-रिषभ पंत, साहव्या क्रमांकावर हार्दिक पांड्या, सात नंबरला रवींद्र जडेजा, आठव्या स्थानी शिवम दुबे यांसह गोलंदाजीत कुलदिप यादव, आर्शदीप सिंग मोहम्मद सिराज याप्रकारे टीम इंडीयाची प्लेइंग 11 असायला हवी.

महत्तवाच्या बातम्या-

आयर्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी, रोहित शर्मानं दिली प्रतिक्रिया म्हणाला, “आयर्लंडविरुद्धचा सामना…”
जगभरात किंग कोहलीचीच हवा! सुपरस्टार नेयमारलाही टाकले मागे
खेळाडूंना भेटण्यासाठी चाहत्यांकडून पैसे घेतले, टी20 विश्वचषकादरम्यान पाकिस्तानच्या टीमचा कारनामा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---