तब्बल चार वर्षाच्या प्रतीक्षेनंतर होत असलेला आशिया चषक २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) येथे खेळला जाणार आहे. आशिया खंडातील प्रमुख संघ या स्पर्धेत सहभागी होतील. चार वर्षांनी होत असलेल्या या स्पर्धेसाठी सर्व संघांनी आपली कंबर कसली आहे. २०१६ नंतर प्रथमच टी२० प्रकारात आशिया चषक खेळला जाईल. आगामी टी२० विश्वचषकाच्या दृष्टीने या स्पर्धेला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. आशिया चषकासाठी निवडलेल्या भारतीय संघावर श्रीलंकेचा माजी कर्णधार माहेला जयवर्धनेने प्रतिक्रिया दिली आहे.
जयवर्धने नुकताच आयसीसीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अनेक मुद्द्यांवर चर्चा करत होता. आगामी आशिया चषकासाठी निवड झालेल्या भारतीय संघाबद्दल बोलताना तो म्हणाला,
“भारतीय संघ अजूनही तितकाच मजबूत आहे. विराट खराब फॉर्ममध्ये आहे. मात्र, तो लवकरच यातून बाहेर येईल. केएल राहुल प्रदीर्घ काळानंतर भारतीय संघासाठी खेळेल. त्याला खेळपट्टीवर वेळ घालवावा लागेल. ही संघासाठी थोडीफार नुकसानकारक बाब असू शकते. वरच्या फळीत संघाकडे रिषभ पंतच्या रूपाने सक्षम पर्याय आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेट जास्त खेळले नाही. मात्र, तो काय करू शकतो आणि त्याची प्रतिभा किती आहे हे आपण पाहिले आहे.”
आशिया चषकासाठी भारतीय गोलंदाजीत जसप्रीत बुमराह व हर्षल पटेल दुखापतीमुळे अनुपस्थितीत आहेत. तर, मोहम्मद शमी याची संघात निवड झाली नाही. त्यामुळे वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारसह अर्शदीप सिंग व आवेश खान यांच्यावर सर्वांचे लक्ष असेल.
आशिया चषकासाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार, आवेश खान.
महत्त्वाच्या बातम्या-
Asia Cup 2022 | ‘बुमराहाची कमी संघाला जाणवेल, पण…’, पाकिस्तानच्या माजी कर्णधाराची मोठी प्रतिक्रिया
‘अर्शदीप सिंग ठरतोय आवेश खानपेक्षाही वरचंढ’, भारताच्या माजी दिग्गजाने केलाय दावा
आशिया कप क्वालिफायर्सचे वेळापत्रक झाले जाहीर; हे चार संघ भारत-पाकिस्तानशी भिडण्याचे दावेदार