---Advertisement---

सौराष्ट्रला रणजी चॅम्पियन बनवण्यानंतर मिळाले मोठी बक्षीस, वेगवान गोलंदाजाचे 10 वर्षांनी संघात पुनरागमन

Indian Team
---Advertisement---

बीसीसीआयने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांसाठी रविवारी (19 फेब्रुवारी) संघ घोषित केला. पहिल्या दोन कसोटी सामन्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठीही संघाची घोषणा यावेळी बीसीसीआयकडून केली केली. वनडे संघात अक्षर पटेल, केएल राहुल आणि श्रेयर अय्यर यांचे पुनरागमन झाले. वनडे संघात सर्वात हैराण करणारा बदल ठरला जयदेव उनाडकट. भारतीय संघाचा हा वेगवान गोलंदाज जवळपास 10 वर्षांनंतर वनडे संघात पुनरागमन करत आहे.

जयदेव उनाडकट (Jaydev Unadkat) याने जुलै 2013 मध्ये भारतासाठी वनडे पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने संघासाठी आतापर्यंत अवघे 7 वनडे सामने खेळले आहेत. नोव्हेंबर 2013 मध्ये त्याने संघासाठी शेवटचा वनडे सामना वेस्ट इंडीज संघाविरुद्ध खेळला होता. मागच्या जवळपास 10 वर्षांमध्ये उनाडकटला एकदाही निवडकर्त्यांनी वनडे संघात निवडण्याची इच्छा दर्शवली नाही. पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध मार्च महिन्यात खेळल्या जाणाऱ्या वनडे मालिकेत उनाडकडला खेळण्याची संधी मिळू शकते. त्याला या मालिकेसाठी वनडे संघात सामील केले गेले आहे.

देशांतर्गत क्रिकेटमधील मानाची स्पर्धा रणजी ट्रॉफी 2023 चा अंतिम सामना रविवारी (19 फेब्रुवारी) खेळला जाणार आहे. उनाडकटच्या नेतृत्वातील सौराष्ट्र संघाने अंतिम सामन्यात बंगाल संघाला मात दिली आणि रणजी ट्रॉफी जिंकली. उनाडकटने या सामन्याच्या पहिल्या डावात 3 तर दुसऱ्या डावात 6 विकेट्स घेतल्या. आपल्या जबरदस्त प्रदर्शनाच्या जोरावर त्याने सौराष्ट्र संघाला विजेतेपद मिळवून दिले आणि स्वतः सामनावीर ठरला. तत्पूर्वी उनाडकटच्याच नेतृत्वात सौराष्ट्र संघाने विजय हजारे ट्रॉफी देखील नावावर केली होती. विजय हजारेच्या 10 सामन्यांमध्ये उनाडकटने 19 विकेट्स घेतल्या होत्या. रणजी ट्रॉफी जिंकल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच बीसीसीआयकडून त्याला वनडे संघात निवडले गेल्याची बातमी मिळाली.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ – 
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, के एल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वाशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल, जयदेव उनादकट.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक –
पहला वनडे सामना – 17 मार्च, मुंबई (दुपारी दोन वाजता)
दुसरा वनडे सामना – 19 मार्च, विशाखापट्टनम (दुपारी दोन वाजता)
तिसरा वनडे सामना – 22 मार्च, चेन्नई (दुपारी दोन वाजता)
(Jaydev Unadkat got a chance in the ODI team after 10 years)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पुजाराला ऑस्ट्रेलियन संघातर्फे 100 व्या कसोटीची ‘स्पेशल गिफ्ट’! खिलाडूवृत्तीने जिंकली मने
केएल राहुलला पुन्हा मिळाली कसोटीत संधी, चाहते म्हणताय….

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---