बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघात काही बदल करण्यात आले आहेत. खेळाडूंच्या दुखापतींमुळे बीसीसीआयला हा निर्णय घ्यावा लागला. संघाचा अनुभव वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्या जागी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने बळी मिळवणाऱ्या जयदेव उनाडकत याला संधी दिली गेली. तब्बल 12 वर्षानंतर त्याचा भारताच्या कसोटी संघात समावेश केला गेला. भारतीय संघाची जर्सी मिळाल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरील आनंद दिसून येत आहे. त्याच्या पत्नीने सोशल मीडियावर त्याचे हे छायाचित्र पोस्ट केले.
बारा वर्षानंतर कसोटी संघात निवड झाल्यानंतर उनाडकत बांगलादेश येथे पोहोचला आहे. उभय संघात 14 डिसेंबरपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. मालिकेच्या आधी त्याला भारतीय संघाची जर्सी देण्यात आली. भारतीय संघाची ही जर्सी हातात घेतलेले त्याचे एक छायाचित्र त्याची पत्नी रिनीने इंस्टाग्रामवर पोस्ट केले. यामध्ये उनाडकतच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्टपणे दिसून येत आहे. त्याच्या पत्नीने या छायाचित्राला ‘तुझा अभिमान असलेली पत्नी’ असे कॅप्शन दिले.
https://www.instagram.com/p/CmDxQUFp_Es/?igshid=YmMyMTA2M2Y=
उनाडकत 2010 मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आपला पहिला व अखेरचा कसोटी सामना खेळला होता. त्या सामन्यात तो एकही बळी घेऊ शकला नव्हता. तसेच त्याने भारतीय संघासाठी अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना चार वर्षांपूर्वी खेळला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरेशी संधी मिळाली नसली तरी, देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याची आकडेवारी जबरदस्त राहिली आहे. त्याने आत्तापर्यंत 96 प्रथमश्रेणी सामने खेळताना 353 बळी मिळवले आहेत. तर, 2019 मध्ये रणजी ट्रॉफी जिंकलेल्या तसेच नुकत्याच झालेल्या विजय हजारे ट्रॉफी विजेत्या सौराष्ट्र संघाचा तो कर्णधार राहिला आहे.
(Jaydev Unadkat Happy Face After Seeing Team India Jersey)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियाचा कर्णधारही पडला ‘बॅझबॉल’च्या प्रेमात! म्हणाला, “हेच क्रिकेट पाहायला आवडतं”
स्टोक्सला आपला युवा फलंदाज वाटतोय दुसरा विराट; पाकिस्तानला चोप-चोप चोपलंय