---Advertisement---

यंदा आरसीबीला मिळणार का विजेतेपद? चाहत्याच्या प्रश्नाला मुंबई इंडियन्सच्या खेळाडूचे भन्नाट उत्तर

On: गुरूवार, एप्रिल 8, 2021 5:23 PM
---Advertisement---

उद्यापासून (९ एप्रिल) इंडियन प्रीमियर लीगच्या उत्सवाला सुरुवात होत आहे. गतवर्षी कोरोना असल्यामुळे आयपीएल २०२० स्पर्धा युएईमध्ये रंगली होती. परंतु यंदाचे आयपीएल २०२१ हंगाम भारतातच रंगणार आहे. या स्पर्धेचा शुभारंभ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याने होणार आहे. या मोठ्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्स संघाच्या खेळाडूने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.

मुंबई इंडियन्स संघाने आयपीएलच्या इतिहासात ५ वेळेस जेतेपद आपल्या नावावर केले आहे. तर दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला गेल्या १३ हंगामात एकही जेतेपद पटकावता आले नाहीये. यामुळेच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ यंदा कसून सराव करून आपले पहिले वहिले जेतेपद मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. अशातच मुंबई इंडियन्स संघाचा अष्टपैलू खेळाडू जिमी नीशमने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाबद्दल मोठे वक्तव्य करत म्हटले आहे की, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ यंदाही विजेतेपद मिळवण्यात अपयशी ठरेल.

जिमी नीशमने आपल्या चाहत्यांशी संवाद साधला, ज्यामध्ये त्याने चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. त्याला एका चाहत्याने विचारले होते की, यंदा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाची आयपीएल स्पर्धा जिंकण्याची किती टक्के शक्यता आहे? यावर जिमी नीशमने उत्तर देत म्हटले की, शून्य टक्के.

गतवर्षी यूएई मध्ये पार पडलेल्या आयपीएल २०२० स्पर्धेत जिमी नीशमने किंग्ज इलेव्हेन पंजाब संघाचे प्रतिनिधित्व केले होते. परंतु निराशाजनक कामगिरीमुळे त्याला लिलावाआधी मुक्त करण्यात आले होते. त्यानंतर आयपीएल २०२१ मध्ये झालेल्या लिलावात त्याला मुंबई इंडियन्स संघाने आपल्या संघात स्थान दिले आहे. मुंबई संघाच्या चाहत्यांना त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

धोनी मैदानात ‘कॅप्टनकुल’ तर मैदानाबाहेर करणार ‘हेरगिरी’; वाचा काय आहे प्रकरण

‘वेगाचा बादशहा’ उसेन बोल्टलाही लागले आयपीएलचे वेध! आरसीबीच्या जर्सीतील फोटो शेअर करत दिला ‘हा’ संदेश

आयपीएल २०२१: ‘ऑरेंज आर्मी’ची पहिली भिडंत केकेआरविरुद्ध, पाहा त्यांचे संपूर्ण वेळापत्रक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---