भारत विरुद्ध श्रीलंका दुसरा एकदिवसीय सामना कोलंबो मैदानावर खेळला गेला. या सामन्यात श्रीलंकेनं भारताचा 32 धावांनी पराभव केला. श्रीलंकेचा उत्कृष्ट फिरकीपटू जेफ्री वँडरसेनं (Jeffrey Vandersay) भारतीय फलंदाजांना डोकं वर काढू दिलं नाही. त्यानं श्रीलंकेसाठी गोलंदाजी करताना 6 विकेट्स त्याच्या नावावर केल्या आणि श्रीलंकेला सामना जिंकून दिला. सामन्यानंतर त्यानं या यशामागील कारणही उघड केले.
जेफ्री वँडरसे (Jeffrey Vandersay) म्हणाला, “श्रीलंका संघात खेळताना माझ्यावर खूप दडपण होते. कारण मी दीर्घ विश्रांतीनंतर सामना खेळत होतो. मला काहीतरी करायचं होतं आणि त्याचं श्रेय घेणं अगदी सोपं आहे. परंतू मी माझ्या कामगिरीचे श्रेय आमच्या फलंदाजांना देखील देऊ इच्छितो. कारण त्यांनी उत्कृष्ट फलंदाजी करुन 240 धावा केल्या आणि त्यामुळंच चांगलं प्रदर्शन करायला मिळालं.”
पुढे बोलाताना वँडरसे म्हणाला, “मला माहित आहे की, दुखापतीमुळे उत्कृष्ट फिरकीपटू वानिंदू हसरंगा संघाच्या बाहेर आहे. मला संघाचं वातावरण माहित आहे. मला सतत प्रयत्न करत राहायच आहे. खेळपट्टीबद्दल बोलायचं झालं तर गोलंदाजी करण्यासाठी खूप मदत मिळत होती. जेव्हा मी पहिली विकेट घेतली तेव्हा मला खूप आत्मविश्वास मिळाला. हे माझं भाग्य आहे की मला 6 विकेट्स मिळवण्यात यश मिळालं.”
भारताविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात जेफ्री वँडरसेनं थरारक गोलंदाजी केली. एकवेळ वाटतं होतं की सामन्याचं पारडं भारताच्या बाजूनं झुकलं आहे. परंतू या फिरकीपटून ते चुकीचं असल्याचं स्पष्ट केलं. वँडरसेनं 6 मोठ्या खेळाडूंच्या विकेट्स घेतल्या. त्यानं दिग्गज खेळाडू रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) यांना पव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानं सलामीवीर शुबमन गिल, शिवम दुबे, श्रेयस अय्यर आणि यष्टीरक्षक केएल राहुल यांना तंबूत पाठवलं.
जेफ्री वँडरसेचं वय सध्या 34 वर्ष 182 दिवस आहे. त्यानं श्रीलंकेसाठी 1 कसोटी, 23 एकदिवसीय आणि 14 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. 1 कसोटी सामन्यात त्यानं 2 विकेट्स घेतल्या आहेत. तर 23 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात त्याच्या नावावर 33 विकेट्स आहेत. 14 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याच्या नावावर 7 विकेट्स आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
टेबल टेनिसमध्ये भारताचा धमाका, महिला संघ क्वार्टरफायनलमध्ये दाखल…!
3 भारतीय खेळाडू, ज्यांना श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेसाठी प्लेइंग 11 मधून बाहेर करण्यात यावं
IND vs SL कर्णधार रोहित शर्मानं रचला इतिहास..! ‘या’ 4 दिग्गजांना पछाडलं