भारतीय महिला संघाची फलंदाज जेमिमा रोड्रिग्स हिने पुन्हा एकदा उत्कृष्ट कामगिरी करण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी (24 जुलै) द हंड्रेड या स्पर्धेत ती फॉर्ममध्ये आलेली दिसून येत आहेत. जेमिमाने नार्दर्न सुपरचार्जर्स संघाकडून उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. तिने या सामन्यात 43 चेंडूमध्ये नाबाद 92 धावा काढल्या आहेत. तिच्या या खेळीमुळे नार्दर्न सुपरचार्जर्स संघाने वेल्स फायर संघावर 6 गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे.
जेमिमाने आपल्या या उत्कृष्ट डावात 17 चौकारांसह 1 षटकार लगावला. तिच्या या महत्वाच्या योगदानामुळे नार्दर्न सुपरचार्जर्स संघाने 85 चेंडूमध्ये 4 विकेट गमावत 131 धावांचे लक्ष्य साध्य केले. तत्पुर्वी वेल्स फायर संघाने 100 चेंडूमध्ये 8 विकेट गमावत 130 धावा केल्या होत्या.
जेमिमाने खेळलेला हा डाव या कारणासाठी महत्वाचा होता. कारण सुपरचार्जर्स संघाला विजयासाठी 131 धावांची गरज होती आणि त्यांची धावसंख्या 18 चेंडूंमध्ये 4 विकेटवर 19 धावा इतकी होती. पण जेमिमाने नंतर संघाचा डाव सांभाळला. इतकेच नव्हे तर संघाला विजय मिळवून दिला. यात तिला एलाइस डेविडसन रिचर्ड्सची साथ मिळाली. एलाइस डेविडसन रिचर्ड्सने देखील 28 चेंडूमध्ये नाबाद 23 धावा केल्या.
यासह द हंड्रेडच्या महिला हंगामात आतापर्यंतची सर्वाधिक वैयक्तिक धावांची जेमिमाने नोंद केली आहे. तिच्या या योगदानामुळे संघाला विजय मिळवता आला आहे. या झंझावती खेळीसाठी तिला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.
✨ The @JemiRodrigues Show ✨
What an innings as Northern Superchargers defeat Welsh Fire! #TheHundred pic.twitter.com/ki1zTBJqwx
— The Hundred (@thehundred) July 24, 2021
जेमिमाव्यतिरिक्त भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हीसुद्धा द हंड्रेड स्पर्धेत सहभागी झाली आहे. ती मँचेस्टर ओरिजनल्स या संघाचे प्रतिनिधित्त्व करत आहे. तसेच शेफाली वर्मा (बर्मिंघम फिनिक्स), दिप्ती शर्मा (लंडन स्पिरीट), स्म्रीती मंधाना (सदर्न ब्रेव्ह) या देखील द हंड्रेड स्पर्धेचा भाग आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘ऋतुराजसह संघातील इतर युवकांना संधी मिळेल, पण…’, पहिल्या टी२०पूर्वी कर्णधार धवनची प्रतिक्रिया
सिक्स मास्टर! असे ४ सलामीवीर, ज्यांनी टी२०च्या पहिल्या षटकात ठोकले भरपूर षटकार
मला श्रीलंका दौऱ्यावर संधी मिळण्याची अपेक्षा होती; ‘या’ विश्वविजेत्या खेळाडूने व्यक्त केली खंत