भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मधल्या फळीतील स्टार क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिग्ज मंगळवारी वेगळ्याच कारणावरून चर्चेत आली. महिला टी20 विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर ती टीकाकारांच्या निशाण्यावर आली आहे. रॉड्रिग्जला स्पर्धेतील 4 डावात एकदाही 30 धावांपर्यंत मजल मारता आली नाही. आता जेमिमासाठी आणखी एक वाईट बातमी आली आहे. मुंबईतील सर्वात जुन्या क्लबपैकी एक असलेल्या खार जिमखान्याने तिचे सदस्यत्व रद्द केले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेमिमाचे वडील इव्हान रॉड्रिग्ज यांच्या कृत्यामुळे खार जिमखान्याने हे पाऊल उचलले आहे. त्यांच्या वडिलांवर धर्मांतराशी संबंधित कार्यक्रमांमध्ये भाग घेतल्याचा आरोप आहे. तिचे वडील इव्हान यांच्या नेतृत्वाखाली काही सदस्यांनी क्लबच्या जागेचा धार्मिक कार्यासाठी वापर केल्याने खार जिमखाना अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. यावर क्लब सदस्यांनी आक्षेप घेतला होता. या धार्मिक कार्यक्रमात धर्मांतरासाठी चिथावणी दिली जात असल्याचे सांगण्यात आले आहे.
याप्रकरणी खार जिमखान्याने रविवारी (20 ऑक्टोबर) वार्षिक सर्वसाधारण सभा बोलावली होती. यामध्ये जेमिमाचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना खार जिमखानाचे अध्यक्ष विवेक देवनानी म्हणाले, “जेमिमा रॉड्रिग्स यांना दिलेले तीन वर्षांचे मानद सदस्यत्व 20 ऑक्टोबर 2024 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत उपस्थित सदस्यांनी मंजूर केलेल्या ठरावानुसार रद्द करण्यात आले.”
याबाबत बोलताना खार जिमखानाच्या व्यवस्थापकीय समितीचे सदस्य शिव मल्होत्रा यांनी सांगितले की, “आम्हाला समजले की जेमिमाचे वडील ब्रदर मॅन्युएल मिनिस्ट्रीज नावाच्या संस्थेशी संबंधित होते. त्यांनी जवळपास दीड वर्षापासून अध्यक्षीय दालन बुक केले होते. या दरम्यान त्यांनी 35 कार्यक्रमांचे आयोजन केले. त्यामध्ये काय चालले होते ते आपल्या सर्वांना माहीत आहे. आपण देशभरात धर्मांतराबद्दल ऐकतो. पण हे तर आपल्या समोरच होत आहे.”
हेही वाचा-
मोठी बातमी..! “जास्त वजन आणि शिस्तभंग प्रकरणी” पृथ्वी शॉची मुंबई संघातून हकालपट्टी
खान कुटुंबीयांसाठी एका पाठोपाठ एक गूड न्यूज, ‘शतकावीर’नंतर सरफराज बनला पिता
IND VS NZ; दुसऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, स्टार खेळाडू फिट..!