क्रिकेटच्या मैदानावर सलामीला फलंदाजी करणारी भारतीय महिला संघाची जोडी, स्म्रिती मंधाना आणि जेमिमाह रोड्रिगेज या युट्यूबवर त्यांचा कार्यक्रम ‘डबल ट्रबल’मध्ये पार्टनरशीप करत आहेत. या कार्यक्रमात त्या एकमेकींची मजाही घेत असतात. आपल्या कार्यक्रमात त्यांनी भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माची मुलाखत घेतली. या दरम्यान स्म्रितीने रोड्रिगेजच्या चवदार चहा बनवण्याच्या शैलीचे गुपित सांगितले.
यानिमित्ताने स्म्रितीने रोड्रिगेजला तिच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट दौऱ्याची आठवण करून दिली. ती म्हणाली, “दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर तू मस्त चहा बनवला होतास. जेमिमाहच्या हातामध्ये नेहमी चहाचा ट्रे असायचा, ज्यामध्ये ३-४ कप ठेवून ती संघातील सगळ्या जेष्ठ महिला क्रिकेटपटूंना चहा पिऊ घालायची. एवढेच नाही तर, तिचे चेहऱ्यावरील हावभाव नेहमी लग्न झालेल्या नव्या नवरीप्रमाणे असायचे. ती खूप लाजायची.”
यावर जेमिमाह म्हणाली, “स्म्रिती तुला आठवण आहे का? तू मला म्हणाली होतीस की, जेमी तू चहाची टपरी टाक. मी पण विचार करतेय की, क्रिकेटव्यतिरिक्त माझ्याकडे कारकिर्दीसाठी अजून एक पर्याय आहे. मी चहाची टपरी सुरु करेन आणि त्यावर तुझा फोटो लावेन. यामुळे माझी टपरी स्टार बनेल.”If cricket carrer ends then Jemimah Rodrigues will open tea stall.
मुंबईच्या रोड्रिगेजने २०१८मध्ये १७ वर्षांच्या वयात भारतीय महिला क्रिकेट संघात पदार्पण केले होते. तिने १६ वनडे सामन्यात ३ अर्धशतकांसह ३७२ धावा केल्या आहेत. पण, ती अधिक चर्चेत आली, ते देशांतर्गत क्रिकेटमध्ये. २०१७मध्ये सौराष्ट्रविरुद्धच्या देशांतर्गत वनडे सामन्यात तिने द्विशतक ठोकले होते. मुंबईकडून खेळताना तिने १६३ चेंडूत २०२ धावांची द्विशतकी खेळी केली होती.
युट्यूबवरील मुलाखती दरम्यान रोड्रिगेजने तिच्या आवडत्या फलंदाजाचे नाव सांगितले आहे. तिचा सर्वात आवडता फलंदाज वनडेत ३ द्विशतके मारणारा, रोहित शर्मा हा आहे. रोड्रिगेजला रोहितप्रमाणे मोठ्या धावा करायच्या आहेत. शिवाय, तिला पाकिस्तानचा फलंदाज बाबर आजमसारखा कव्हर ड्राइव्ह शॉट खेळायला खूप आवडतो. एवढेच नव्हे तर, रोड्रिगेजला एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली फलंदाजी करायची होती. पण ती म्हणाली की, प्रत्येक स्वप्न पूर्ण होण्यासाठी नसते.
रोड्रिगेजला जगातील त्या दमदार फलंदाजांमध्ये गणले जाऊ शकते, ज्यांनी अवघ्या २ सामन्यात प्रतिभा मिळवली आहे. वयाच्या १२व्या वर्षी क्रिकेटला गांभिर्याने घेणारी जेमी ही हॉकीसुद्धा खेळली आहे. तिने १० वर्षांखालील आणि १२ वर्षांखालील महाराष्ट्र संघाकडून हॉकी राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतला होता. तसेच क्रिकेटचा दिवस रात्र सराव केल्यानंतर तिच्या भावाने तिला हॉकी स्टीक भेट दिली होती. म्हणून तिने हॉकी खेळायला सुरुवात केली होती.
ट्रेंडिंग घडामोडी-
पदार्पणाच्या काही दिवस आधी लाराच्या वडिलांचे झाले होते निधन, ऑस्ट्रेलियाचे चॅलेंज स्विकारुन…
कमेंटमुळे वैतागलेल्या रोहित शर्माने लाईव्ह सेशनदरम्यानच वापरले अपशब्द
सध्या टीम इंडियाचा सदस्य असलेल्या खेळाडूने केला होता ३ वेळा आत्महत्या…