आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप चॅलेंज लीग २०१९-२०२२ साठी नुकत्याच दोन स्पर्धा खेळल्या गेल्या. २७ जुलै ते ६ ऑगस्ट या कालावधीत कॅनडातील लीग ए आणि जर्सीमध्ये ४ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट दरम्यान लीग बी सामने खेळले गेले. लीग बीमध्ये जर्सीने १५ पैकी ११ सामने जिंकले आणि युगांडाला सरस रनरेटच्या आधारे स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला. आता कॅनडा व जर्सी २०२३ च्या वनडे विश्वचषकाच्या क्वालिफायर्स प्ले-ऑफसाठी पात्र ठरले आहेत.
A superior net run-rate has helped Jersey top the ICC Men's Cricket World Cup Challenge League B standings.
More on their dream of qualifying for the main event ➡️ https://t.co/qXEqfpOpSA pic.twitter.com/qwZ61jUwDc
— ICC (@ICC) August 15, 2022
चार ते चौदा ऑगस्ट दरम्यान लीगमध्ये १५ सामने खेळले गेले. यजमान जर्सीने पाच सामन्यांत चार विजय नोंदवले आणि गुणतालिकेत २२ गुणांसह पहिले स्थान पटकावले. जर्सीने युगांडाचा ५ गडी राखून, बर्म्युडाचा २०६ धावांनी, हाँगकाँगचा ७ गडी राखून आणि इटलीचा १४५ धावांनी पराभव केलेला. मात्र, केनियाने अखेरच्या सामन्यात त्यांचा ४ गडी राखून पराभव केला होता. मात्र, पराभवानंतरही जर्सीचा संघ नेट रनरेटमध्ये युगांडाच्या वरच राहिला.
आयसीसी विश्वचषक चॅलेंज लीगमधील लीग ए आणि लीग बी मधील अव्वल दोन संघ २०२३ च्या वनडे विश्वचषकासाठी क्वालिफायर्स प्ले-ऑफसाठी पात्र ठरतील. जर्सी लीग बी मधून पुढील फेरीसाठी पात्र ठरली आहे. तर लीग ए मधून कॅनडाची वाटचाल जवळपास निश्चित आहे. परंतु १ ते १४ डिसेंबर दरम्यान मलेशियातील शेवटच्या फेरीनंतर याबाबत अधिकृत घोषणा होईल.
महत्त्वाच्या बातम्या-
‘पाकिस्तान विरुद्ध नाही, ट्रॉफी जिंकण्यासाठी खेळा’; टीम इंडियाला ‘दादा’ने दिला प्रेमाचा सल्ला
देशातील बड्या नेत्याच्या मुलाचं क्रिकेट असोसिएशनमधील मोठं पद जाणार! सुप्रिम कोर्ट ठरतंय अडथळा
‘बाबरचे वादळ रोखणं होतंय कठीण!’ मागील ८ पैकी ७ सामन्यात झळकावलंय अर्धशतक, वाचा रेकॉर्ड्स