आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२१ चा २० वा सामना बांगलादेश आणि इंग्लंड क्रिकेट संघादरम्यान सामना खेळला गेला. बुधवार (२७ ऑक्टोबर) रोजी अबू धाबी येथील शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या रोमांचक सामन्यात इंग्लिश सलामीवीर जेसन रॉयने फलंदाजी करताना त्याच्या टी२० कारकिर्दीतील २० वे अर्धशतक झळकावले. रॉय फलंदाजी करत असताना स्टेडियममधील एका प्रेक्षकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आयसीसीने एक गमतीदार व्हिडिओ शेअर केला आहे.
रॉयने आपल्या उत्कृष्ट खेळीत केवळ ३८ चेंडूंचा सामना करत ६१ धावांची दमदार खेळी खेळली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून पाच चौकार आणि तीन षटकारही निघाले. सामना संपल्यानंतर आयसीसीने जेसन रॉयचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये दिसते की, इंग्लिश सलामीवीर रॉयने बांगलादेशसाठी सातवे षटक आणणाऱ्या मेहदी हसनच्या गोलंदाजीवर एक जोरदार फटका खेळला आणि चेंडू सीमारेषेपासून अगदी जवळच्या अंतरावर पडला आणि षटकार ठरला. हा चेंडू थोडा जवळ आला असता, तर सीमारेषेजवळ उभ्या असलेल्या बांगलादेशचा क्षेत्ररक्षक मोहम्मद नईमने त्याचा झेल सहज घेतला असता, पण तसे होऊ शकले नाही.
आयसीसीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रॉयच्या या उत्कृष्ट षटकाराच्या आधी एक प्रेक्षक डायनासोरसारख्या पुतळ्यावर बसलेला दिसत होता. यामुळे इतर प्रेक्षकांचे देखील मनोरंजन होत होते. या प्रेक्षकाचे सोंगाडे डायनासोरवर बसलेल्या व्यक्तीचा भास घडवत होते. हा व्हिडिओ शेअर करत आयसीसीने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘जेसन रॉयचा ज्युरासिक सिक्स.’
https://www.instagram.com/reel/CViEsU6lc1u
बांगलादेश संघाविरुद्ध आठ गडी राखून दणदणीत विजय मिळवल्यानंतर इंग्लंड क्रिकेट संघ अ गटात पहिल्या स्थानावर पोहोचला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलदरम्यान धोनीने कोणता सल्ला दिला होता? मार्कस स्टॉयनिसने केला खुलासा
भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी न्यूझीलंड संघाला टेंशन, ‘हा’ प्रमुख खेळाडू झाला जखमी
बाबो! सलग ५ चेंडूत गेल्या ५ विकेट्स, ब्राझीलच्या लॉरा कार्डोसोने टाकले ऐतिहासिक षटक






