पुणे, दि. २९ ऑगस्ट २०२३ – पुना क्लब लिमिटेड यांच्या वतीने आयोजित पूना क्लब फिटनेस लीग स्पर्धेत जेट्स संघाने एकूण ११३ गुणांची कमाई करताना आठ संघांमध्ये आघाडीचे स्थान पटकावताना विजेतेपद संपादन केले.
पूना क्लब येथील हॉलमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत राकेश नवानी यांच्या मालकीच्या जेट्स संघाने एकूण ११३ गुणांची कमाई करत अव्वल क्रमांक पटकवला. तर, विशाल सेठ यांच्या मालकीच्या २७ स्पेशल ब्रिक हाऊस संघाने १०५ गुणांची कमाई करत दुसरा क्रमांक पटकावला. शैलेश रांका व कुणाल संघवी यांच्या मालकीच्या एसके बॉडी टोनर्स संघाने १०१ गुणांसह तिसरा क्रमांक पटकावला.
स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पूना क्लबचे अध्यक्ष सुनील हांडा, उपाध्यक्ष व स्पर्धा सचिव गौरव गढोके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मनजीत राजपाल आणि स्पर्धा संचालक तुषार आसवानी आदी मान्यवर उपस्थित होते. (Jets win the Poona Club Fitness League 2023)
इतर पारितोषिके:
स्पर्धेतील ताकदवान पुरुष खेळाडू: श्लोक सागर(इस्टेटली लेजेंड्स),सौरव घुले(जेट्स), शमशुद्दीन विराणी(आयुग वेलनेस);
स्पर्धेतील ताकदवान महिला खेळाडू: संजना देसाई(27 स्पेशल ब्रिक हाऊस), कविता कनाकिया(इस्टेटली लीजेंड्स),
तंदरुस्त पुरुष खेळाडू: रियान मुजगुले(किंग्स), निखिल मोहिते(जेट्स), नितीन रजनी(मिशन इम्पॉसिबल), अर्णव नायडू(मिशन इम्पॉसिबल), सिद्धांत टिपणीस(27 स्पेशल ब्रिक हाऊस);
तंदरुस्त महिला खेळाडू: श्रेया गुरव(एसके बॉडी टोनर्स), बबिता नायडू(किंग्स), संजना देसाई(27 स्पेशल ब्रिक हाऊस), कल्पना राठोड(परमार ऑल स्टार्स).
महत्वाच्या बातम्या –
नवव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत किड्स गटात फिंच संघाला विजेतेपद
BREAKING! पाकिस्तान तयार, आशिया कपच्या पहिल्या मॅचसाठी एक दिवस आधीच प्लेइंग इलेव्हनची घोषणा