भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. रविवारी (18 सप्टेंबर) दौऱ्यावरील वनडे मालिकेला सुरुवात झाली. होव येथील या सामन्यात भारतीय खेळाडूंनी शानदार गोलंदाजी करत इंग्लंडला 222 धावांवर रोखले. आपली अखेरची मालिका खेळत असलेल्या भारताच्या अनुभवी वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामीने या सामन्यात शानदार गोलंदाजी करत सर्वांची मने जिंकली.
टी20 मालिका गमावल्यानंतर वनडे मालिकेत भारतीय संघाला विजयाची अपेक्षा आहे. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सर्वच गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करत इंग्लंडला मोकळ्या हाताने फलंदाजी करू दिली नाही. भारतासाठी सात गोलंदाजांनी गोलंदाजी केली. निर्धारित 50 षटकात इंग्लंड केवळ 7 बाद 227 धावा केल्या. इंग्लंडसाठी डेविसन रिचर्डने सर्वाधिक 50 धावांची खेळी केली.
या मालिकेनंतर निवृत्तीची घोषणा केलेल्या अनुभवी झूलन गोस्वामीने पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीचे अक्षरशः प्रदर्शन लावले. तिने नेहमीप्रमाणे अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत इंग्लिश फलंदाजांना जखडून ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आपल्या 10 षटकात केवळ 20 धावा देत 2 निर्धाव षटके टाकत तिने एक बळी मिळवला. विशेष म्हणजे तिने टाकलेल्या 60 चेंडूंपैकी 42 चेंडू हे निर्धाव स्वरूपाचे होते.
झूलन गोस्वामी ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आजवरची सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. चकदा एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झूलनने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला 2002 मध्ये सुरुवात केली होती. तीने आतापर्यंत 201 वनडेत 252 तर, 68 टी20 मध्ये 56 आणि 12 कसोटीत 44 बळी मिळवले आहेत. तसेच तिला काही काळ भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची देखील संधी मिळाली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
म्हणून शमीच्या जागी संघात झाली उमेशची एंट्री, कॅप्टन रोहित शर्माने दिले स्पष्टीकरण
इंडिया ए ची न्यूझीलंड ए वर सरशी! दणदणीत विजयासह मालिकाही घातली खिशात
“त्याने स्वतःला सिद्ध केलंय”, या खेळाडूच्या कामगिरीने रोहित झालाय भलताच खुश