---Advertisement---

चौदा कोटी मिळवणाऱ्या रिचर्डसनची लिलावावेळी झाली होती ‘अशी’ अवस्था, स्वतः केला खुलासा

On: रविवार, फेब्रुवारी 21, 2021 10:07 PM
---Advertisement---

चेन्नई येथे १८ फेब्रुवारी रोजी आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव पार पडला. अंतिम यादीतील २९८ खेळाडूंपैकी ५७ खेळाडूंवर बोली लागली. या लिलावामध्ये अनेक विदेशी खेळाडू कोट्याधीश झाले. ऑस्ट्रेलियाचा युवा वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसन याच्यावर देखील या लिलावात अनपेक्षितरीत्या १४ कोटींची बोली लागली. लिलावावेळी आपल्या भावना काय होत्या? याबाबत रिचर्डसनने खुलासा केला आहे.

रिचर्डसनने केला त्यावेळचा खुलासा

ज्यावेळी आपल्यावर बोली लावली जात होती, त्या वेळी आपल्या भावना काय होत्या, याबाबतचा खुलासा रिचर्डसनने केला आहे. रिचर्डसन म्हणाला, “ज्यावेळी लिलावकर्त्याने माझे नाव घेतले तेव्हा मी सावरून बसलो. पहिले पाच-सात सेकंद कोणीही पॅडलवर उचलला नाही तेव्हा स्वतः शी म्हणलो, असे व्हायला नाही पाहिजे. मात्र, त्यानंतर बोली लागली. तो काही सेकंदांचा काळ मला आयुष्यासारखा वाटला. परंतु, त्यानंतर बोली वाढत गेली. माझा लिलाव संपल्यानंतर ती रक्कम ऑस्ट्रेलियन डॉलरमध्ये किती होते आहे, हे मी सर्वप्रथम पाहिले.”

रिचर्डसनवर लागली विक्रमी बोली

ऑस्ट्रेलियाचा युवा वेगवान गोलंदाज असलेला झाय रिचर्डसन प्रथमच आयपीएलमध्ये सहभागी होणार आहे. चेन्नई येथील लिलावात दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर व पंजाब किंग्ज या संघांमध्ये त्याच्यासाठी जोरदार रस्सीखेच झाली. अखेरीस, पंजाब किंग्सने १४ कोटी रुपयांची बोली लावत त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. भारतीय रूपयांमध्ये १४ कोटी असलेली ही रक्कम ऑस्ट्रेलियन डॉलरमध्ये २.४८ मिलियन इतकी आहे.

चांगल्या फॉर्ममध्ये आहे रिचर्डसन

सध्या २४ वर्षाचा असलेला रिचर्डसन चांगल्या फॉर्ममध्ये आहे. नुकत्याच संपलेल्या बिग बॅश लीगमध्ये त्याने १७ सामन्यात २९ बळी आपल्या नावे केले होते. ज्यामध्ये त्याची सरासरी अवघी १६.३१ इतकी होती. रिचर्डसनने ऑस्ट्रेलियाकडून १३ वनडे, २ कसोटी व ९ टी२० सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याच्या नावे अनुक्रमे २४, ६ व ९ बळी जमा आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

सीएसकेचे फलंदाज झोकात! दोन दिवसात तीन फलंदाजांनी झळकावले शतक

तेवतिया ऑन फायर!! एकदिवसापूर्वीच टीम इंडियात निवड झालेल्या राहुलची ६ षटकारासह ताबडतोड खेळी

आयपीएल लिलावात अनसोल्ड राहिल्यानंतर फिंचची प्रतिक्रिया; म्हणाला, ‘मला माहित होते…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---