---Advertisement---

‘तेव्हा रिचर्डसन मला शाळकरी मुलासारखा वाटला होता’, भारतीय दिग्गजाने सांगितली मजेशीर आठवण

On: मंगळवार, एप्रिल 13, 2021 6:07 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील चौथा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात झाला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात शेवटच्या चेंडूपर्यंत रोमांच पाहायला मिळाला. या सामन्यात पंजाब किंग्सने ४ धावांनी विजय मिळवला. या सामन्यातून आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या झाय रिचर्डसनविषयी भारताचे दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी एक आठवण सांगितली.

तो मला शाळकरी मुलासारखा वाटला
मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यातून ऑस्ट्रेलियाचा युवा वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसनने आयपीएल पदार्पण केले. रिचर्डसनविषयी बोलताना भारताचे दिग्गज फलंदाज व सध्या समालोचन करणाऱ्या सुनील गावसकर यांनी रिचर्डसनसोबत झालेल्या आपल्या पहिल्या भेटीची आठवण सांगितली.

गावसकर म्हणाले, “आठ-दहा दिवसांपूर्वी मी रिचर्डसनला पहिल्यांदा पहिले होते. दुबईहून मुंबईकडे येत असताना आम्ही एकाच विमानाने प्रवास करत होतो. तो माझ्या समोरून गेला, तेव्हा मला एका शाळकरी मुलाप्रमाणे वाटला. तो माझ्यापासून दोन ओळी सोडून बसला. सायमन डूल माझ्यासोबत प्रवास करत होता. त्याने मला म्हटले, ‘याला ओळखले का?’ मी नाही म्हटल्यानंतर त्याने, हा झाय रिचर्डसन असल्याचे सांगितले.”

सुनील गावसकर यांनी रिचर्डसन व दुसरा युवा वेगवान गोलंदाज रायली मेरेडिथ हे संपूर्ण आयपीएल हंगामात पंजाब किंग्ससाठी उत्तम कामगिरी करतील असा आशावाद व्यक्त केला आहे. मेरेडिथला ८ कोटी रुपयांना पंजाबने खरेदी केले आहे.

मोठ्या किमतीत झाला पंजाब किंग्सचा भाग
सध्या २४ वर्षाचा असलेला रिचर्डसन ऑस्ट्रेलियाकडून केवळ २ कसोटी, ३ वनडे व ९ टी२० सामने खेळला आहे. आयपीएल २०२१ च्या लिलावात पंजाब किंग्सने १४ कोटी रुपयांची बोली लावत त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. आपल्या पदार्पणाच्या सामन्यात तो अतिशय महागडा ठरला. चार षटकात त्याने ५५ धावा देत बटलरचा महत्त्वपूर्ण बळी मिळवला.

महत्त्वाच्या बातम्या –

“मला विश्वास आहे, तो नक्की पुनरागमन करेल”, कुलदीप यादवच्या मदतीला धावला भारतीय दिग्गज

असा कर्णधार होणे नाही!!!

राजस्थानविरुद्ध शेवटचे षटक टाकणाऱ्या अर्शदीपने सांगितले संजू सॅमसन विरुद्ध होता ‘हा’ प्लॅन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---