---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध सेमीफायनल जिंकल्यानंतर जिमी नीशम आपल्या खुर्चीवरून का हलला नाही? स्वत:च केला खुलासा

On: गुरूवार, नोव्हेंबर 11, 2021 11:00 PM
---Advertisement---

बुधवारी (१० नोव्हेंबर ) आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील पहिला सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंड आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आमने-सामने होते. या सामन्यात जो संघ विजयी होणार त्या संघाला अंतिम फेरीत जाण्याची सुवर्णसंधी होतीच, यासह न्यूझीलंड संघाकडे २०१९ विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा बदला घेण्याची देखील संधी होती. या संधीचे सोने करत न्यूझीलंड संघाने जोरदार विजय मिळवला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यानंतर जिमी नीशमचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

जिमी नीशम हा आपल्या मजेशीर स्वभावामुळे ओळखला जातो. अनेकदा तो मस्ती करताना देखील दिसून आला आहे. परंतु इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या सामन्यानंतर भलतेच काही चित्र पाहायला मिळाले होते. जिमी नीशम जेव्हा बाद झाला, त्यावेळी न्यूझीलंड संघ विजयाच्या अगदी जवळ पोहोचला होता.

त्यानंतर न्यूझीलंड संघाने जेव्हा विजय मिळवला, त्यावेळी न्यूझीलंड संघाचे खेळाडू उत्साह साजरा करताना आणि डान्स करताना दिसून आले. फक्त केन विलियमसन शांत होता. परंतु त्याच्या चेहऱ्यावर देखील आनंद होता. या डगआऊटमध्ये एकच असा व्यक्ती होता, जो खुर्चीवर पुतळ्या सारखा बसून होता. तो म्हणजे जिमी नीशम. त्याचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.

इतकेच नव्हे तर, जेव्हा संघातील खेळाडू जल्लोष साजरा करून माघारी परतले होते. त्यावेळी देखील तो एकटा खुर्चीवर बसला होता. न्यूझीलंडचे खेळाडू उत्साहात मग्न होते. परंतु, तो एकमेव खेळाडू होता जो शांत बसून होता. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांना प्रश्न उपस्थित झाले होते की, जिमी नीशमने असे का केले.

आता स्वतः जिमी नीशमने याबाबत खुलासा केला आहे. त्याने म्हटले की, “काम संपलेय का? मला वाटत नाही”. त्याच्या म्हणण्याचा अर्थ होता अजून अंतिम सामना बाकी आहे, त्यामुळे त्याचे काम संपलेले नाही.

या मोठ्या सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंड संघाकडून प्रथम फलंदाजी करताना मोईन अलीने नाबाद ५१ धावांची तुफानी खेळी केली. तर डेविड मलानने ४१ आणि जोस बटलरने २९ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर इंग्लंड संघाला २० षटक अखेर ४ बाद १६६ धावा करण्यात यश आले होते.

त्यानंतर १६७ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाकडून डॅरील मिशेलने सर्वाधिक ७२ धावांची खेळी केली. तर डेवोन कॉनवेने ४६ धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले. तसेच, मोक्याच्या क्षणी जिमी नीशमने ११ चेंडूत २७ धावांची खेळी केली. त्यामुळे हा सामना न्यूझीलंड संघाने जिंकला. न्यूझीलंड संघाने आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

गावसकरही झाले बाबर आझमवर प्रभावित; म्हणाले, ‘…तर तो एक महान खेळाडू होईल’

केवळ १३ आंतरराष्ट्रीय टी२० खेळण्याची मिळाली संधी, पण त्याने भारताला मिळवून दिले होते विश्वचषक जेतेपद

आयपीएस अधिकारी व्हायचे स्वप्न पाहणारा मुलगा बनला क्रिकेटपटू, वाचा संजू सॅमसनचा प्रेरणादायी प्रवास

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---