---Advertisement---

‘बर्थडे बॉय’ निशामने साधला टीम इंडियाच्या स्टार खेळाडूवर निशाणा; म्हणतोय…

On: शनिवार, सप्टेंबर 17, 2022 9:19 PM
---Advertisement---

न्यूझीलंडचा अष्टपैलू जिमी निशाम शनिवारी (17 सप्टेंबर) आपला 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. निशामचा समावेश टी20 क्रिकेटमधील धोकादायक फलंदाजांमध्ये होतो. निशामने टी20 च्या 38 आंतरराष्ट्रीय डावांमध्ये 165.84 च्या स्ट्राइक रेटने 607 धावा केल्या आहेत. पूर्ण सदस्य देशांच्या खेळाडूंमध्ये भारताच्या सूर्यकुमार यादवनंतर निशामचा स्ट्राईक रेट सर्वाधिक आहे.

एका प्रसिद्ध क्रिकेट संकेतस्थळाने जिमी निशामला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत निशामच्या फलंदाजीचे कौतुक केले आहे. यादरम्यान, त्या संकेतस्थळाच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये नमूद केले आहे की, टी20 इंटरनॅशनलमध्ये निशामचा स्ट्राइक रेट सूर्यकुमार यादवनंतर सर्वोत्तम आहे. यानंतर नीशमने सूर्यकुमार यादव याला टॅग करून एक गमतीशीर प्रतिक्रिया दिली.

 

‘तुम्ही एक चांगले ट्विट का खराब केले?’ असा प्रश्न त्याने विचारला. सूर्यकुमार आणि निशाम मुंबई इंडियन्ससाठी आयपीएलमध्ये एकत्र खेळले आहेत. सूर्यकुमार हा देखील सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. तसेच दोघांचा स्वभाव ही अत्यंत मजेदार आहे.

निशाम हा दोन दिवसांपूर्वी चांगलाच चर्चेत आला होता. आपल्या केंद्रीय बोर्डाचा करार त्याने स्वीकारण्यास नकार दिला होता. ट्रेंट बोल्ट व कॉलिन डी ग्रॅंडहोम यांच्यानंतर असा निर्णय घेणारा तो तिसरा न्यूझीलंडचा खेळाडू आहे. जगभरातील टी20 लीगमध्येही आपण खेळण्यासाठी उत्सुक असल्याचे त्याने म्हटले होते. बोर्डाच्या काही जाचक अटींमुळे अनेक खेळाडू हा निर्णय घेताना दिसत आहेत.

त्याच्या आजवरच्या कारकिर्दीचा विचार केल्यास त्याने 12 कसोटी, 71 वनडे व 48 टी20 सामने खेळले आहेत. अष्टपैलू निशामच्या नावावर तीन हजाराच्या आसपास धावा व 108 बळी मिळवले आहेत. तसेच तो आयपीएलमध्ये यावर्षी राजस्थान रॉयल्ससाठी खेळताना दिसला होता.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या – 

वर्ल्डकपआधीच रोहित आणि द्रविडला मिळाली वॉर्निंग! काय आहे संपूर्ण प्रकरण?
विराटच्या शिरपेचात मानाचा तुरा! टी20 इतिहासात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘अशी’ कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
गुजरात टायटन्सने शुबमन गिलला दिला नारळ? ट्विट करत लिहिले… 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---