इंग्लंड विरुद्ध आयर्लंड संघात ३० जुलैपासून ३ सामन्यांच्या वनडे मालिकेची सुरुवात झाली आहे. ३० जुलै रोजी साउथम्पटन येथे पहिला वनडे सामना पार पडला. परंतु, उर्वरित दोन वनडे सामन्यांपुर्वी इंग्लंडला मोठा झटका बसला आहे. इंग्लंडचा फलंदाज जो डेन्लीच्या पाठीला दुखापत झाल्यामुळे संघातून बाहेर करण्यात आले आहे. तो उर्वरित २ वनडे सामने खेळू शकणार नाही. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) बुधवारी आपल्या वेबसाइटवरुन या गोष्टीची माहिती दिली. Joe Denly Is Ruled Out From Remaining Odi Series Due To Injury
डेन्लीच्या (Joe Denly) ठिकाणी १४ सदस्यीय इंग्लंड संघात लियाम लिविंगस्टोनला (Liam Livingstone) प्रवेश देण्यात आला आहे. लिविंगस्टोनने इंग्लंडकडून २ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. जर, वनडे मालिकेतील उर्वरित २ सामन्यात त्याची अंतिम ११ मध्ये निवड झाली. तर, तो वनडे पदार्पण करु शकतो.
इंग्लंडने गुरुवारी पार पडलेल्या पहिल्या वनडे सामन्यात आयर्लंडला ६ विकेट्सने पराभूत केले. त्यामुळे इंग्लंड ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. या सामन्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज डेव्हिड विलीने ३० धावा देत ५ विकेट्स चटकावल्या. एका वनडे सामन्यात ५ विकेट्स घेण्याची ही विलीची पहिली वेळ होती. त्याच्या या पराक्रमामुळे त्याला पहिल्या वनडे सामन्यात सामनावीर पुरस्कार देण्यात आला. तसेच, इंग्लंडकडून फलंदाज सॅम बिलिंग्सनेही नाबाद ६७ धावांची खेळी करत संघाच्या विजयात हातभार लावला होता.
वनडे मालिकेतील दूसरा सामना आज (१ ऑगस्ट) साउथम्पटन येथे खेळला जाणार आहे. कोव्हिड-१९ दरम्यान खेळण्यात येणारी ही पहिली वनडे मालिका आहे. तसेच या मालिकेसोबत आयसीसी विश्वचषक सुपर लीगचीही सुरुवात झाली आहे. मालिकेतील सर्व सामने प्रेक्षकाविंना जैव सुरक्षित वातावरणात खेळले जात आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
-आयपीएलमध्ये मिळाली नाही संधी आता निवृत्तीनंतर एलपीएल मध्ये खेळणार ‘हा’ भारतीय खेळाडू
-‘शुबमन गिलने कोणालाही शिवी दिली नाही,’ पहा कोण म्हणतंय
ट्रेंडिंग लेख –
-भारताकडून एकही सामना न खेळलेले परंतू आयपीएलमध्ये हॅट्रिक घेणारे ३ प्रतिभावान क्रिकेटर
-क्रिकेटवर बनलेल्या या २ जबरदस्त बॉलिवूड चित्रपटांना दुर्लक्ष करुन चालणार नाही
-आयपीएल २०२०: ‘या’ ३ कारणांमुळे विराटचा आरसीबी संघ यंदा जिंकू शकतो आयपीएल ट्रॉफी