नुकतीच ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (AUS vs ENG) यांच्यात प्रतिष्ठित ऍशेस मालिका २०२१-२२ (Ashes Series 2021-22) पार पडली आहे. इंग्लंडने ४-० च्या मोठ्या फरकाने ही मालिका गमावली आहे. संपूर्ण मालिकेत निराशादायी प्रदर्शन करणाऱ्या इंग्लंड संघाचे खेळाडू पराभवाचे दुख पचवण्यासाठी आपले लक्ष इतर गोष्टीत गुंतवत आहेत. नुकताच इंग्लंड संघाचा कर्णधार जो रूट (Joe Root) आपल्या संघ सहकाऱ्यांसह पार्टी करताना दिसून आला आहे. त्यांच्या या पार्टीत ऑस्ट्रेलियाचे काही खेळाडूही सहभागी झाले होते.
होबार्ट येथील हॉटेलच्या छतावर बसून हे सर्व खेळाडू बीयरचा (England And Australia Players Doing Party) आनंद घेत होते. इतक्यात पोलिस तिथे आल्याने त्यांच्या (Caught By Police) रंगात भंग पडला. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.
व्हिडिओ पाहा- क्रिकेटर्सलाही मागे सोडत ‘हे’ अंपायर कमावतात चिक्कार पैसा
माध्यमांतील वृत्तांनुसार, ही घटना सोमवारी (१७ जानेवारी) सकाळची आहे. जो रूटसह, वेगवान गोलंदाज जेम्स अंडरसन, ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू नॅथन लायन, ट्रॅविस हेड आणि ऍलेक्स कॅरी हे एकत्र बीयर पार्टीचा आनंद लुटत होते. त्यावेळी पोलिसांना खूप गोंधळ होत असल्याची तक्रार मिळाल्याने ते घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी सर्व खेळाडूंना आपापल्या खोलीत परत जाण्याचा आदेश दिला. पोलिसांपुढे या क्रिकेटपटूंची एक चालली नाही आणि ते त्वरित आपापल्या खोलीत परतले.
हा संपूर्ण प्रसंग घडत असताना एक अधिकारी त्यांचा व्हिडिओ रिकॉर्ड करताना दिसत आहे. या व्हिडिओत महिला पोलिस अधिकारी म्हणत आहे की, तुम्ही खूप गोंधळ करत आहात. ही लोकांची झोपायची वेळ आहे. पोलिसांच्या या सुचनेनंतर सर्व खेळाडू शांतपणे आपल्या खोलीत परत जाताना दिसत आहेत.
The first and last time #Hobart will host an #Ashes test… ‘Bit too loud’ .. Awesome pic.twitter.com/zdZ4dmcsf6
— Matt de Groot (@mattdegroot_) January 18, 2022
दरम्यान होबार्ट येथे ऍशेस मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना झाल्याने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू काही वेळासाठी तिथेच थांबले होते. यादरम्यान ही घटना घडली आहे.
हेही वाचा- रोहितनंतर खुद्द सिनियर शर्माजींची मैदानावर जोरदार फटकेबाजी, वडिलांच्या फलंदाजीवर ‘हिटमॅन’ही फिदा
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्या ऍशेस मालिकेतील प्रदर्शनाबाबत बोलायचे झाल्यास, ऑस्ट्रेलियाने विजयासह या मालिकेची सुरुवात केली होती. त्यांनी ब्रिसबेन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडला ९ विकेट्सने पराभूत केले होते. त्यानंतर ऍडलेडमधील दुसरा कसोटी सामनाही ऑस्ट्रेलियाने २७५ धावांनी जिंकला होता. तर मेलबर्नमध्ये एक डाव आणि १४ धावांनी विजय मिळवत त्यांनी मालिका खिशात घातली होती.
पुढे इंग्लंडने कसाबसा चौथा कसोटी सामना अनिर्णीत राखण्यात यश मिळवले होते. हा सामना सिडनी येथे झाला होता. मात्र त्यानंतर होबार्ट येथील पाचव्या सामन्यात पुन्हा ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला १४६ धावांनी पराभवाची धूळ चारत मालिका ४-० ने जिंकली आहे.
महत्वाच्या बातम्या-
सचिनसोबत विक्रमी भागीदारी, ७ सामन्यात दोन द्विशतके, तरी कांबळीची अवघ्या २ वर्षात संपली कारकीर्द
हेही पाहा-