---Advertisement---

जो रूट एक्सप्रेस सुस्साट! इंग्लंडच्या कर्णधाराचे तुफानी शतक; मोडला मियाँदादचा रेकॉर्ड

On: गुरूवार, ऑगस्ट 26, 2021 9:47 PM
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना लीड्सच्या मैदानावर सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यापासून इंग्लंडचा कर्णधार जो रूट अप्रतिम फलंदाजी करताना दिसून येत आहे. त्याने पहिल्या दोन्ही सामन्यात शतक झळकावले होते. तसेच तिसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात देखील शतकी खेळी केली आहे. यासह त्याने भारतीय संघाविरुद्ध आणखी मोठा विक्रम करत दिग्गज खेळाडूंना मागे टाकले आहे.

जो रूट भारतीय संघाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत धावांचा पाऊस पाडत आहे. त्याने पहिल्या दोन्ही सामन्यात तुफानी शतक झळकावले होते. तसेच तिसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात देखील शतक ठोकत आपली अप्रतिम कामगिरी सुरू ठेवली आहे. यासह त्याने भारतीय संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत त्याने पाकिस्तानच्या जावेद मियाँदाद यांना मागे टाकले आहे.

खरे तर त्याने आपल्या खेळीदरम्यान ५५ धावा करताच हा विक्रम मोडला होता. रूट ज्यावेळी ५५ धावांवर फलंदाजी करत होता, त्यावेळी त्याच्या नावे भारतीय संघाविरुद्ध २२३० धावांची नोंद झाली आहे. मियाँदाद यांनी भारतीय संघाविरुद्ध ५ शतकांच्या साहाय्याने २२२८ धावा केल्या होत्या. याखेरीज तो सक्रिय क्रिकेटपटूंमध्ये भारतीय संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही ठरला आहे.

त्याची आक्रमक फलंदाजी पाहून असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, जावेद मियाँदाद नंतर तो लवकरच क्लाइव लॉयड यांना देखील मागे टाकेल. तर क्लाइव लॉयड यांनी भारतीय संघाविरुद्ध २८ सामन्यात ७ शतकांच्या साहाय्याने २३४४ धावा केल्या आहेत. (Joe root breaks jawed miyadad record, most runs against India)

भारतीय संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रिकी पाँटिंगच्या नावे आहे. रिकी पाँटिंगने भारतीय संघाविरुद्ध २९ सामने खेळले होते. यादरम्यान त्याने ८ शतकांच्या साहाय्याने २५५५ धावा केल्या होत्या. तर इंग्लंडचा माजी कर्णधार ॲलिस्टर कूक या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. कुकने भारतीय संघाविरुद्ध एकूण ३० सामने खेळले, यादरम्यान त्याने ७ शतकांच्या साहाय्याने २४३१ धावा केल्या आहेत. तर क्लाइव लॉयड तिसऱ्या आणि जो रूट चौथ्या क्रमांकावर आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

ENGvIND, 3rd Test, 2nd Day Live: खणखणीत चौकारासह जो रूटची शतकाला गवसणी, इंग्लंडच्या ३ बाद ३३३ धावा, २५५ धावांची आघाडीही घेतली

संधीचं सोनं! तीन वर्षांनंतर कसोटीत पुनरागमन करत मलानचे झुंजार अर्धशतक, त्याचा आनंद तर पाहा

दिस इज सर जडेजा वे! अर्धशतकवीर हमीदला धाडले तंबूत, रहस्यमयी चेंडूवर केले क्लीन बोल्ड

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---