सध्या न्यूझीलंडचा संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या संघाने न्यूझीलंडला धुळ चारली. इंग्लंडने ५ गडी राखत लॉर्ड्सच्या मैदानावर न्यूझीलंडचा पराभव केला. या कसोटी सामन्यात इंग्लंडचा माजी कर्णधार जो रुट याने उत्कृष्ट खेळी करत शतक झळकावले. या शतकाच्या मदतीने रुटने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. आणि एका जागतिक विक्रमाची नोंद आपल्या नावे केली.
जो रुट (Joe Root) हा कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा पार करणारा जगातील १४वा खेळाडू बनला आहे. त्याच्या आधी इंग्लंडकडून खेळताना ऍलिस्टर कुक (Alister Cook) याने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने १० हजार धावांचा टप्पा पूर्ण केला होता. मात्र, जो रुट याने सर्वात कमी कालावधीमध्ये १०हजार धावा बनवण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे.
जो रूटने डिसेंबर २०१२ मध्ये भारताविरुद्ध कसोटी पदार्पण केले आणि त्यानंतर त्याने ११८ कसोटी सामन्यांच्या २१८ डावांमध्ये ४९.५७ च्या सरासरीने १००१५ धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या २५४ धावा आहे. रूटच्या नावावर २६ कसोटी शतके आणि ५६ अर्धशतके आहेत. सक्रिय कसोटी फलंदाजांमध्ये सर्वात वेगाने १०,००० धावांचा टप्पा पार करणारा रूट हा पहिला फलंदाज आहे.
कमा कालावधीत १० हजार कसोटी धावा पूर्ण करणारे फलंदाज
३१ वर्षे १५७ दिवस – जो रूट
३१ वर्षे १५७ दिवस – ऍलिस्टर कुक
३१ वर्षे ३२६ दिवस – सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar)
कसोटीत सर्वाधिक शतके करणारा सक्रिय फलंदाज
२७ – स्टीव्ह स्मिथ (Steve Smith)
२६ – जो रूट
२४ – डेव्हिड वॉर्नर (David Warner)
२४ – केन विल्यमसन (Kane Williamson)
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
चॅपेल प्रकरण झाले नसते, तर युवराज महान कर्णधार झाला असता, माजी संघसहकाऱ्याचा दावा
विराट मोडणार सचिनच्या १०० शतकांचा विक्रम?, पाहा काय म्हणतायेत रोहितचे प्रशिक्षक
‘तर संघातील खेळाडू बदलावे लागतील’, कपिल देव यांनी रोहित, राहुल, विराटला सुनावले खडेबोल






