ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (Australia vs England) या दोन्ही संघांमध्ये ऍशेस मालिकेचा (Ashes series) थरार सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने ९ गडी राखून विजय मिळवला होता, तर दुसऱ्या सामन्यात देखील ऑस्ट्रेलिया संघाने २७५ धावांनी विजय मिळवला आहे.
या सामन्यात इंग्लंड संघाला विजयासाठी ४७८ धावांची आवश्यकता होती. परंतु, इंग्लंडचा दुसरा डाव १९२ धावांवर संपुष्टात आला. या डावात इंग्लंड संघाचा कर्णधार जो रूट देखील अवघ्या २४ धावा करत माघारी परतला. दरम्यान फलंदाजी करत असताना जो रूट सोबत (joe root) एक धक्कादायक घटना घडली, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
धावांचा पाठलाग करताना डेविड मलान (Dawid Malan) २० धावा करत माघारी परतला होता. त्यानंतर जो रूट फलंदाजी करण्यासाठी खेळपट्टीवर आला होता. त्याने डाव सावरत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना गडी बाद करण्यापासून रोखले होते. परंतु, चौथ्या दिवसाचा (१९ डिसेंबर) खेळ संपायला अवघे २ दिवस शिल्लक असताना, जो रूट सोबत एक धक्कादायक घटना घडली. (Mitchel Starc ball hit on joe root private part)
जो रूटसाठी सामन्याचा चौथा दिवस (१९ डिसेंबर) खूप कठीण ठरला. तो फलंदाजीला आल्यानंतर दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर शेवटी जेव्हा मिचेल स्टार्क गोलंदाजीला आला होता, त्यावेळी मिचेल स्टार्कने एक घातक चेंडू टाकला होता. जो टप्पा पडून आत आला आणि जो रूटच्या प्रायव्हेट पार्टला जाऊन लागला. त्यानंतर तो वेदनेने कळवळत असल्याचे दिसून आला. त्यानंतर ४४ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर तो ॲलेक्स कॅरीच्या हातून झेलबाद होऊन माघारी परतला.
That has floored Root.
Ouch. #Ashes pic.twitter.com/JSbsdr9Z76
— cricket.com.au (@cricketcomau) December 19, 2021
ऑस्ट्रेलिया संघाचा दुसरा विजय
ऑस्ट्रेलिया संघाने ऍशेस मालिकेत २-० ची आघाडी घेतली आहे. दिवस-रात्र स्वरुपात झालेल्या दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद ४७३ धावांवर पहिला डाव घोषित केला होता. त्यानंतर इंग्लंडला पहिल्या डावात २३६ धावाच करता आल्या. ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव ९ बाद २३० धावांवर घोषित केला आणि इंग्लंडला ४७८ धावांचे आव्हान दिले. पण, इंग्लंडला १९२ धावाच दुसऱ्या डावात करता आल्या.
महत्वाच्या बातम्या :
“रोहितची फलंदाजी पाहण्यासाठी मी पैसेही खर्च करू शकतो”, संघसहकाऱ्याकडून कर्णधाराचे कौतुक
बीसीसीआयने विराटविरोधात आखले होते षडयंत्र? महत्वाची माहिती समोर