इंग्लंडच्या जो रूट आणि हॅरी ब्रूक यांनी दमदार कामगिरी केली. पाकिस्तानविरुद्ध मुलतान येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडच्या जो रूट आणि हॅरी ब्रूक यांनी एकाच डावात एकत्र खेळताना दोघांनी द्विशतके झळकावली. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात दुसऱ्यांदा असा पराक्रम इंग्लंडकडून पाहायला मिळाला. याशिवाय इंग्लिश फलंदाजांनी 400 हून अधिक धावांच्या भागीदारीसह अनेक विक्रम रचले.
इंग्लंडकडून एकाच डावात दोन द्विशतके
इंग्लंडने प्रथमच 1985 मध्ये,कसोटीच्या एकाच डावात दोन द्विशतके झळकावली होती. जी ग्रॅमी फॉलर आणि माईक गॅटिंग यांनी केली होती. भारताविरुद्ध चेन्नई येथे झालेल्या कसोटीत इंग्लिश फलंदाजांनी हा पराक्रम केला होता. ग्रॅमी फॉलरने 201 आणि माइक गॅटिंगने 207 धावा केल्या. आता रूट आणि ब्रूक यांनीही तोच चमत्कार केला आहे. रूट आणि ब्रूक यांनी मुलतानमध्ये पाकिस्तानविरुद्ध ही कामगिरी केली. रूटने 305 चेंडूत तर ब्रुकने 245 चेंडूत दुहेरी शतक पूर्ण केले.
400 हून अधिक धावांची भागीदारी
रूट आणि ब्रूक यांनी एकत्रित फलंदाजी करत द्विशतक ठोकले. त्यानंतर 400 हून अधिक धावांची भागीदारीही पूर्ण केली. इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 400 धावांची भागीदारी पूर्ण होण्याची ही दुसरीच घटना आहे. 1957 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात पीटर मे आणि कॉलिन काउड्री यांनी इंग्लंडसाठी पहिल्यांदा कसोटीत 400 हून अधिक धावांची भागीदारी केली होती.
पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक 250 धावा
जो रूटने दुसऱ्यांदा पाकिस्तानविरुद्ध 250 हून अधिक धावा करण्याचा पराक्रम केला. याआधी टीम इंडियाचा माजी दिग्गज फलंदाज वीरेंद्र सेहवाग पाकिस्तानविरुद्ध दोनदा 250 हून अधिक धावा करणारा एकमेव फलंदाज होता.
इंग्लंडसाठी 250 प्लसचा सर्वोच्च स्कोअर
रूटने 250 धावांचा टप्पा ओलांडला आणि विशेष यादीत आपला समावेश केला. दोनदा 250 हून अधिक धावा करणारा तो इंग्लंडचा तिसरा फलंदाज ठरला. त्याच्या आधी वॅली हॅमंड आणि ॲलिस्टर कुक यांनी ही कामगिरी केली.
हेही वाचा-
ind vs ban; हार्दिक पांड्या बिबट्याच्या वेगाने धावून घेतला अशक्यप्राय झेल, पाहा VIDEO
PAK vs ENG; जो रूट मुलतानचा नवा सुलतान, पाकिस्तानविरुद्ध दणदणीत द्विशतकी खेळी
IND vs BAN: दमदार कामगिरीबाबत बोलताना रिंकू म्हणाला, “मी माही भाईकडून…”,