ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड(Australia vs England) या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने ९ गडी राखून, तर दुसऱ्या कसोटी सामन्यात २७५ धावांनी विजय मिळवला होता. सलग २ कसोटी सामने गमावल्यानंतर इंग्लंड संघ अडचणीत सापडला आहे, तर नुकताच जाहीर करण्यात आलेल्या आयसीसी कसोटी क्रमवारीत फलंदाजांच्या यादीमध्ये इंग्लिश कर्णधार जो रुटचे (Joe Root) मोठे नुकसान झाले आहे.
नुकताच जाहीर करण्यात आलेल्या आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत विराट कोहली, जो रूट, स्टीव्ह स्मिथ नव्हे, तर मार्नस लॅब्यूशेनने पहिले स्थान गाठले आहे. त्याने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट रेटिंग पॉइंट्ससह (९१२) दिग्गज फलंदाजांना मागे टाकत अव्वल स्थान गाठले आहे, तर जो रूट (८९७) या यादीत दुसऱ्या स्थानी घसरला आहे.
ऍशेस मालिका(Ashes series) सुरू होण्यापूर्वी मार्नस लॅब्यूशेन(Marnus Labhuchagne) चौथ्या स्थानी होता. त्याने पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघासाठी ७४ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर तो दुसऱ्या स्थानी पोहोचला होता. तर दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावले. या अप्रतिम खेळीच्या जोरावर त्याने कसोटी फलंदाजांच्या यादीत पहिले स्थान गाठले आहे. याच खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया संघाने २७५ धावांनी विजय मिळवत, २-० ची आघाडी घेतली आहे.
भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली याला(Virat Kohli) गेल्या काही महिन्यांपासून साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. तो न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या मुंबई कसोटीत शून्यावर बाद झाला होता. ज्याचा परिणाम त्याच्या आयसीसीच्या क्रमवारीवर झाला आहे. तो सातव्या स्थानी (७५६) पोहोचला आहे. तर रोहित शर्मा (७९७) टॉप – ५ मध्ये कायम आहे. या दोन्ही फलंदाजांव्यतिरिक्त इतर कुठलाही फलंदाज टॉप १० मध्ये नाहीये.
🔝 Labuschagne dethrones Root
💪 Starc makes significant gainsAustralia stars shine in the latest @MRFWorldwide ICC Men’s Test Player Rankings.
👉 https://t.co/DNEarZ8zhm pic.twitter.com/W3Aoiy3ARP
— ICC (@ICC) December 22, 2021
गोलंदाजांच्या यादीत फारसा बदल झाला नाहीये. ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघाचा कर्णधार पॅट कमिन्स पहिल्या स्थानी कायम आहे. तर भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू आर अश्विन दुसऱ्या स्थानी आहे. आर अश्विन यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज आहे.
महत्वाच्या बातम्या :
पुनरागमनाची आस! फॉर्ममध्ये परतण्यासाठी केकेआरचा ‘हा’ शिलेदार मैदानात गाळतोय घाम, व्हिडिओ व्हायरल
दक्षिण आफ्रिकेत भारतीय फलंदाजांनी केलेल्या ‘या’ ५ खेळींनी जिंकली सर्वांची मनं
“कपिल देव यांची गोलंदाजी ॲक्शन कॉपी करण्यासाठी ६ महिने करावा लागला ४ तास सराव”
हे नक्की पाहा : आफ्रिदीने विश्वविक्रम केला, तोही सचिनच्या बॅटने